मविआच्या जयश्री जाधव कोल्हापुरातील पहिल्या महिला आमदार

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी सरकारने बाजी मारली आहे. कोल्हापूर पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला आहे. तर, भाजपचे सत्यजित कदम यांचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे, कोल्हापुरानतू पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी पटकावला आहे. आज सकाळपासूनच कोल्हापूरच्या मतदानाची मतमोजणी सुरू होती. जयश्री जाधव यांनी पहिल्या […]

मविआच्या जयश्री जाधव कोल्हापुरातील पहिल्या महिला आमदार

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी सरकारने बाजी मारली आहे. कोल्हापूर पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला आहे. तर, भाजपचे सत्यजित कदम यांचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे, कोल्हापुरानतू पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी पटकावला आहे.

आज सकाळपासूनच कोल्हापूरच्या मतदानाची मतमोजणी सुरू होती. जयश्री जाधव यांनी पहिल्या फेरीपासूनच कमालीची आघाडी घेतली होती. दरम्यान, एकूण २६ फेऱ्यांमध्ये ९६२२६ मत जयश्री जाधव यांना मिळाली असून जाधव यांनी १८८०० मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपच्या सत्यजित कदम यांचा ७७४२६ मतं मिळवत पराभव झाला आहे.

कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या जयश्री जाधव आणि भाजपचे सत्यजित कदम रिंगणात होते. दोन्ही पक्षांमध्ये विजयासाठीची चुरस पाहायला मिळाली. तर या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात ठाण मांडला होता. तर कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी जोमात प्रचार केला होता. मात्र, अखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी भाजपच्या सत्यजित पाटील यांना पराभूत केले आहे.

काँग्रेसचे नेते चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पुन्हा पोटनिवडणुक घेण्यात आली. या निवडणुकीसाठी मविआकडून काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी निवडणूक लढवली तर भाजपकडून सत्यजित कदम यांनी निवडणूक लढवली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number