जयंत पाटील यांना ‘लाईफटाईम अचिव्हमेंट’ पुरस्काराने सम्मानित

द शुगर टॅक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात जयंत पाटील यांना 'लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड 2025' पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

जयंत पाटील यांना ‘लाईफटाईम अचिव्हमेंट’ पुरस्काराने सम्मानित

ज्योत्सना गंगणे. प्रतिनिधी. मुंबई: 'द शुगर टॅक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया (STAI) तर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जयंत पाटील यांना 'लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड 2025' पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील यांना 'इंडस्ट्री एक्सीलन्स अवॉर्ड 2025' पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार दिल्लीत आयोजित करण्यात आले असून या पुरस्कारांमुळे, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा रोवला गेला आहे.

हेही वाचा: Sambhajinagar Crime: प्रेमात धोका, वादातून टोकाचं पाऊल; प्रियकराने प्रेयसीला खोल घाटात ढकललं

राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचा इतिहास

राजारामबापू सहकारी साखर कारखाना, इस्लामपूर हा सांगली जिल्ह्यातील एक महत्वाचा साखर कारखाना आहे. हा कारखाना 1969 मध्ये सुरू झाला आणि 1970 पासून या कारखान्याचे कामकाज सुरू केले होते. माननीय मंत्री राजारामबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना महाराष्ट्रातील सहकारी साखर उद्योगात एक महत्त्वाचे नाव बनले आहे. स्वर्गीय. राजाराम बापू पाटील यांच्या निधनानंतर, या कारखान्याची जबाबदारी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना देण्यात आली. तब्बल 10 वर्षे, जयंत पाटील यांनी चेअरमन म्हणून कामकाज पाहिले.‌ त्यानंतर, जयंत पाटील यांनी या कारखान्याचे व्यवस्थापन त्यांच्या इतर सहकाऱ्यांकडे सोपवले. दोन वर्षांपूर्वी जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांनी कारखान्याची निवडणूक लढवली आणि विजयी झाले. आज प्रतीक पाटील कारखान्याचे कामकाज अतिशय योग्य पद्धतीने पाहत आहेत. कधीकाळी एक युनीट पर्यंत मर्यादित असणारा राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे आज चार युनिट कार्यरत आहेत. दरम्यान, 'आपल्या कारखान्याच्या माध्यमातून मिळालेले‌ हे पुरस्कार म्हणजे कारखान्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान आहे', अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number