जागतिक महिला दिनानिमित्त जनतेला संभोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देशाचे पंतप्रधान म्हणून राष्ट्रपती असलेल्या द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख करण्यात आला. सोशल मीडियावर शिंदेंचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यातच आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधान परिषद गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची नियुक्ती करण्यात आली मात्र नियुक्तीच्या पत्रात एकनाथ खडसे यांच्या नावाऐवजी एकनाथ शिंदे या नावाचा उल्लेख आहे त्यावरून त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची फिरकी घेतली आहे.
जयंत पाटील म्हणाले की…
” राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषद गटनेते पदी एकनाथ खडसे यांचं नाव दिले होते. मात्र १० मार्च च्या पत्रकानुसार, एकनाथ खडसे यांच्या नावाऐवजी एकनाथ शिंदे असं नाव आहे. सरकारच्या वेबसाईट वर अजूनही हेच नाव आहे. एकनाथ शिंदे यांनी तर काल देशाचे पंतप्रधानच बदलले होते. देशाच्या पंतप्रधानपदी द्रौपदी मुर्मू यांचं नाव जाहीर केलं.”
जयंत पाटलांचा मुख्यामंत्र्यांना टोला
राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेच्या गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची नेमणूक करावी, असे पत्र विधान परिषदेच्या उपसभापतींना पाठवले होते. मात्र, विधान परिषदेकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकांमध्ये एकनाथ खडसे यांच्या नावा ऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं नाव आढळून आल्याने जयंत पाटलांनी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाना साधला.
“माझ्याकडे असणारे विधिमंडळ पक्षनेतेपदाच पद सुद्धा धोक्यात आलं आहे असं वाटतंय. नागालँड मध्ये मुख्यमंत्री रिओ सगळ्या पक्षाचा पाठिंबा घेत आहेत, त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी पद्धत पाडली आहे का? राष्ट्रवादीच्याही विधीमंडळ गटनेते पदावर नेमणूक व्हावी, अशी शिंदेंची इच्छा आहे का? असा सवाल करत जयंत पाटलांनी मुख्यमंत्री शिंदेंना टोला लगावला.