Satara ZP Election : जयकुमार गोरे, शिवेंद्रराजेंच्या राजकीय खेळीला यश; साताऱ्यात कमळ फुललं

सातारा : सातारा जिल्हा परिषदेतील हाय व्होल्टेज राजकीय ड्रामाचा अखेर थरारक शेवट झाला असून सत्तेची बाजी पुन्हा एकदा भाजपनेच मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येत भाजपविरोधात मैदानात उतरले होते. मात्र प्रत्यक्ष निकालात भाजपनेच आपला दबदबा सिद्ध केला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा एकदा सातारा जिल्हा […]

Satara ZP Election : जयकुमार गोरे, शिवेंद्रराजेंच्या राजकीय खेळीला यश; साताऱ्यात कमळ फुललं

सातारा : सातारा जिल्हा परिषदेतील हाय व्होल्टेज राजकीय ड्रामाचा अखेर थरारक शेवट झाला असून सत्तेची बाजी पुन्हा एकदा भाजपनेच मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येत भाजपविरोधात मैदानात उतरले होते. मात्र प्रत्यक्ष निकालात भाजपनेच आपला दबदबा सिद्ध केला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा एकदा सातारा जिल्हा परिषदेवर निर्विवाद झेंडा फडकावला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी प्रिया महेश शिंदे यांची निवड झाली असून, उपाध्यक्षपदी राजू भोसले यांनी बाजी मारली आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षानंतर अखेर भाजपनेच सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे. विशेष म्हणजे, भाजपकडे अवघे 27 सदस्य असतानाही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गोटातून काही मते फुटल्याने समीकरणे बदलली आणि त्याचा थेट फायदा भाजपला झाला. या घडामोडींमुळे विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. एकूणच, साताऱ्यातील हा राजकीय थरार भाजपच्या विजयाने संपला असून, सातारा जिल्हा पुन्हा एकदा भाजपचा बालेकिल्ला ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : Ashok Kharat Case: भोंदू बाबा खरातचं ‘बिंग’ कसं फुटलं? पाच कोटींची खंडणी, सीसीटीव्ही फुटेज आणि तो ऑफिस बॉय, काय घडलं नेमकं?

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number