Ajit Pawar Plane Crash : अक्षम्य चूक! कॉकपीटमधील थरारक व्हिडीओ, पायलटच्या सीटवर VSRचे मालक, लेकाची प्रशासनाकडे आर्त हाक

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर जय पवार यांनी व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोप करत व्हायरल व्हिडीओच्या आधारे कारवाईची मागणी केली आहे.

Ajit Pawar Plane Crash : अक्षम्य चूक! कॉकपीटमधील थरारक व्हिडीओ, पायलटच्या सीटवर VSRचे मालक, लेकाची प्रशासनाकडे आर्त हाक

Ajit Pawar plane crash: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला महिना उलटला असला तरी त्या दुर्घटनेभोवतीचे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. हा अपघात नेमका कसा घडला, तांत्रिक बिघाड होता की मानवी निष्काळजीपणा, यावर अद्याप स्पष्ट चित्र समोर आलेले नाही. नुकताच समोर आलेल्या प्राथमिक चौकशी अहवालात विमान झाडाला धडकल्याने कोसळल्याचा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. मात्र या अहवालावर अनेक स्तरांवरून शंका उपस्थित केल्या जात आहेत.

दरम्यान, या प्रकरणाला नवं वळण देणारी घटना समोर आली आहे. अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत VSR कंपनीचे मालक रोहित सिंह उड्डाणादरम्यान पायलटच्या सीटवर झोपलेले दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सार्वजनिक होताच सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

हेही वाचा:Sunetra Pawar: माळेगाव साखर कारखान्यात नाट्यमय घडामोडी; चेअरमन निवड लांबणीवर पडली असली तरी सुनेत्रा पवारांचा मार्ग मोकळा?

जय पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये अत्यंत भावनिक शब्दांत प्रतिक्रिया नोंदवली आहे. वडिलांच्या निधनाची वेदना व्यक्त करत त्यांनी या व्हिडीओतील दृश्य अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे. उड्डाणाच्या वेळी पायलट सीटवर असलेल्या व्यक्तीचा असा निष्काळजीपणा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी नागरी उड्डाण महासंचालनालयाकडे (DGCA) तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे.

जय पवार यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कंपनीची सर्व विमाने ग्राउंड करण्याची आणि रोहित सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. ही केवळ वैयक्तिक वेदना नसून प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्याकडून अजितदादांच्या आठवणींना उजाळा; म्हणाल्या, ‘अजितदादांची इच्छा होती की…’

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर VSR कंपनीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. विमान कंपनीच्या सुरक्षाविषयक मानकांबाबत आणि नियमांचे पालन कितपत केले जाते, यावर चर्चा रंगली आहे. यापूर्वीही कंपनीच्या कार्यपद्धतीवर काही राजकीय नेत्यांकडून आरोप झाले होते. आता या नव्या घडामोडीमुळे त्या आरोपांना अधिक धार मिळाल्याचे चित्र आहे.

या प्रकरणावर कंपनीकडून अधिकृत भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असता कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. त्यामुळे संशय अधिकच गडद होत आहे. अपघाताच्या चौकशी अहवालावर आधीच टीका होत असताना आता या व्हिडीओमुळे तपास यंत्रणांवर अधिक पारदर्शक आणि सखोल चौकशी करण्याचा दबाव वाढला आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number