Israel Air Strike: एकीकडे शांततेच्या चर्चा सुरू दुसरीकडे लेबनॉन रक्ताने माखले; इस्रायली हवाई हल्ल्यात तिघांचा मृत्यू

अमेरिका-इराण शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली असून, पुढील काही दिवस निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

Israel Air Strike: एकीकडे शांततेच्या चर्चा सुरू दुसरीकडे लेबनॉन रक्ताने माखले; इस्रायली हवाई हल्ल्यात तिघांचा मृत्यू

पश्चिम आशियातील तणाव अधिकच तीव्र होत असताना लेबनॉन मध्ये इस्त्रायल कडून हवाई हल्ले सुरूच आहेत. शनिवारी दक्षिण लेबनॉनमधील नबातीयह परिसरातील मेफादौन या गावातील एका निवासी इमारतीवर करण्यात आलेल्या हल्ल्यात किमान तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हा हल्ला अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा इस्लामाबाद येथे अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता चर्चेची तयारी सुरू आहे. या चर्चेत स्थायी युद्धविराम (सीजफायर) या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या हल्ल्यामुळे चर्चेच्या पार्श्वभूमीवर तणाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लेबनॉन हा देखील अमेरिका-इराण चर्चेतील एक महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. इराणचा दावा आहे की, पूर्वी झालेल्या दोन आठवड्यांच्या युद्धविरामात लेबनॉनचा समावेश होता. मात्र, बेंजामिन नेतन्याहू आणि डोनाल्ड ट्रम्प  यांनी स्पष्ट केले आहे की त्या युद्धविरामात लेबनॉनचा समावेश नव्हता.

लेबनॉनवरील हल्ल्यांमुळे इराणने इस्लामाबादमध्ये होणाऱ्या चर्चेत सहभागी होण्यास सुरुवातीला नकार दिला होता. मात्र, इस्त्रायलने लेबनॉनसोबत चर्चेला तयार असल्याचे संकेत दिल्यानंतर इराणनेही भूमिका मवाळ केली आहे. 14 एप्रिल 2026 रोजी इस्त्रायल आणि लेबनॉन यांच्यात थेट चर्चा होण्याची शक्यता असून, लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आउन यांनी याबाबत माहिती दिली आहे.

हेही वाचा: Crude Oil Price: आनंदाची बातमी! कच्च्या तेलांच्या दरात मोठी घसरण, गेल्या 6 वर्षात पहिल्यांदाच स्वस्त झालं तेल

दरम्यान, दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी अमेरिकेतील अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर चर्चा केली आहे. आगामी चर्चेत अमेरिका मध्यस्थाची भूमिका निभावणार आहे. या चर्चेत युद्धविरामाच्या अटी आणि पुढील शांततेचा मार्ग निश्चित करण्याचा प्रयत्न होणार आहे.

लेबनॉनला हिज्बुल्लाह आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्ष संपवण्यासाठी थेट संवाद हवा आहे. मात्र, हा संवाद युद्धविरामाच्या चौकटीत व्हावा, अशी त्यांची भूमिका आहे. इस्त्रायलनेही लेबनानच्या विनंतीनंतर चर्चेसाठी तयारी दर्शवली असली, तरी हिज्बुल्लाह आणि लेबनॉन यांचा सीजफायरमध्ये समावेश नसल्याचा दावा केला आहे.

28 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झालेल्या संघर्षात इस्त्रायलने लेबनॉनवरील हल्ले तीव्र केले आहेत. लेबनॉनच्या सरकारी आकडेवारीनुसार, अवघ्या 40 दिवसांत सुमारे 1,900 जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसातच 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची घटना या संघर्षातील सर्वाधिक भीषण मानली जात आहे.

एकूणच, सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे आणि प्रलंबित शांतता चर्चांमुळे पश्चिम आशियातील परिस्थिती अत्यंत नाजूक बनली असून, पुढील काही दिवस या प्रदेशासाठी निर्णायक ठरणार आहेत. 

हेही वाचा: Mathura Boat Accident Video: भजनात दंग असलेल्या भाविकांची बोट उलटली; मृत्यूच्या आधीचा 'तो' धडकी भरवणारा व्हिडीओ समोर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number