Iran-Israel war : गेल्या वर्षभरापासून तेहरानच्या सर्व रस्त्यांवरील CCTV हॅक, सुरक्षारक्षकांवर नजर; टार्गेट सेट आणि अटॅक, असा झाला खामेनींचा खात्मा

युद्धात इराणचे प्रमुख खामेनींचा खात्मा करण्यात अमेरिकेला मोठं यश आलं आहे.

Iran-Israel war : गेल्या वर्षभरापासून तेहरानच्या सर्व रस्त्यांवरील CCTV हॅक, सुरक्षारक्षकांवर नजर; टार्गेट सेट आणि अटॅक, असा झाला खामेनींचा खात्मा

इराण आणि इस्त्रायलच्या युद्धात अमेरिकेन उडी घेत इराणविरोधात कंबरी कसली आहे. या युद्धात इराणचे प्रमुख खामेनींचा खात्मा करण्यात अमेरिकेला मोठं यश आलं आहे. परंतू खामेनींना कस घेरलं, हा प्लॅनदेखील अवाक् करणारा आहे. जाणून घेऊया…

इराणी मंत्री, अधिकाऱ्यांच्या गाड्या, त्यांचे नंबर, गार्ड आणि चालकांची माहिती मोसादकडे होती. गेल्या वर्षभरापासून तेहरानच्या सर्व रस्त्यांवरील सीसीटीव्ही हॅक करण्यात आले होते. कोणते सुरक्षारक्षक स्वतःच्या कारनं कामाला येतात. कार कुठे पार्क करतात हे देखील मोसादपर्यंत पोहोचत होतं.  कुठल्या मंत्र्याकडे कोणत्या सुरक्षारक्षकाची ड्यूटी लागली आहे, ही माहितीसुद्धा इस्रायलकडे होती. यावरून इराणी मंत्री, अधिकाऱ्यांच्या सर्व हालचाली तेल अवीवला पोहोचत होत्या. 

हेही वाचा : BJP Rajya Sabha Candidate List : राज्यसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; महाराष्ट्रातून कोणाकोणाची वर्णी?, वाचा यादी

या सर्व विश्लेषणामुळे मोसादच्या काही अधिकाऱ्यांना तेहरानचा नकाशा आपल्या तळहातासारखा माहीत होता. हल्ल्याच्या काही मिनिटं आधी मोसादनं तेहरानमधील मोबाईल टॉवर हॅक केले. यामुळे जर टार्गेटवरील मंत्री, अधिकाऱ्यांनी फोन लावण्याचा प्रयत्न केला तर फोन व्यस्त आहे, अशी टेप वाजावी जेणेकरून हल्ल्याची कुणकुण लागली तरी इराणी अधिकारी एकमेकांना सांगू शकणार नाहीत. मात्र खामेनी त्या दिवशी, त्या क्षणाला त्या इमारतीत आहेत. याची खात्री मोसादच्या दोन अधिकाऱ्यांनी दिली. कारण इतक्या महत्त्वाच्या टार्गेटच्या माहितीसाठी मोसाद एका अधिकाऱ्यावर अवलंबून राहत नाही, दोन अधिकारी अनेक महिने एकाच टार्गेटवर काम करत असतात.

मात्र आपल्याप्रमाणं आणखी एक अधिकारी त्याच टार्गेटवर काम करत आहेत, हे दुसऱ्या अधिकाऱ्याला माहीत नसतं. शनिवारी सकाळी दोन्ही अधिकाऱ्यांनी खामेनींचं एकच लोकेशन कळवलं. त्याचसोबत, सीआयच्या तेहरानमधील मानवी हेरानंसुद्धा त्याची पुष्टी केली. त्यानंतर दोन्ही देशांच्या लष्कराची चक्रं वेगानं फिरली आणि खामेनींना टिपण्यात आलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number