Iran US Talk: अमेरिका-इराणमध्ये दुसऱ्यांदा होणार चर्चा, समोरासमोर नाही तर ‘या’ माध्यमातून साधणार संवाद

इस्लामाबाद येथे बॅक-चॅनल चर्चेला वेग आला आहे. या चर्चेमुळे मध्यपूर्वेतील तणाव कमी होतो की वाढतो, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

Iran US Talk: अमेरिका-इराणमध्ये दुसऱ्यांदा होणार चर्चा, समोरासमोर नाही तर ‘या’ माध्यमातून साधणार संवाद

वॉशिंग्टन: मध्यपूर्वेत गेल्या काही आठवड्यांपासून वाढलेला तणाव आता नव्या कूटनीतिक टप्प्यात प्रवेश करताना दिसत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात सार्वजनिक स्तरावर तीव्र शब्दयुद्ध सुरू असतानाच, पडद्यामागे संवादाचे प्रयत्न वेगाने सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे, या संवाद प्रक्रियेत पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत असून, पुढील चर्चेचे केंद्र इस्लामाबाद बनले आहे.

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी वरिष्ठ प्रतिनिधीमंडळासह इस्लामाबादला भेट दिली आहे. ते पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख साय्यद आसिम मुनीर यांच्याशी चर्चा करणार आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी स्वतः विमानतळावर जाऊन त्यांचे स्वागत केले, यावरून इस्लामाबाद या प्रक्रियेला किती गांभीर्याने घेत आहे हे स्पष्ट होते.

इराणने मात्र अधिकृतपणे अमेरिकेशी थेट चर्चेला नकार दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाकाएई यांनी स्पष्ट केले की, इराणच्या अटी आणि भूमिका पाकिस्तानमार्फत वॉशिंग्टनपर्यंत पोहोचवल्या जातील. त्यामुळे ही प्रक्रिया पारंपरिक द्विपक्षीय चर्चेपेक्षा ‘मध्यस्थी’ म्हणूनच मांडली जात आहे. दुसरीकडे, अमेरिकेकडून मात्र याला संवादाची नवी सुरुवात मानले जात आहे.

हेही वाचा: Atal Pension Yojana: अटल पेन्शन योजनेची मर्यादा दुप्पट होणार; 5 हजारांऐवजी थेट 10 हजार मिळणार?, अर्थ मंत्रालयात हालचालींना वेग

व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जारेड कुशनर पाकिस्तानात जाणार आहेत. मात्र, उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स या चर्चेत सहभागी होणार नाहीत. यावरून ही चर्चा औपचारिक शिखर बैठकीपेक्षा ‘बॅक-चॅनल’ स्तरावर अधिक केंद्रित असल्याचे संकेत मिळतात.

या तणावाचे मुख्य कारण होर्मुज सामुद्रधुनी आहे. इराणची मागणी आहे की अमेरिकेने त्यांच्या बंदरांवरील आणि जहाजवाहतुकीवरील निर्बंध हटवावेत. तर अमेरिकेची भूमिका अशी आहे की, इराणने आपल्या अणुकार्यक्रमाबाबत ठोस आणि पडताळणीयोग्य हमी द्यावी. सध्या परिस्थिती अशी आहे की, या मार्गातून दररोज 130 जहाजांऐवजी केवळ 5 जहाजेच जात आहेत, ज्यामुळे जागतिक तेलवाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की इराण एक प्रस्ताव तयार करत आहे. त्यांनी इराणला समृद्ध युरेनियम कार्यक्रम थांबवण्याचे आणि आंतरराष्ट्रीय तेलवाहतुकीला अडथळा न आणण्याचे आवाहन केले आहे. तसेच, कोणताही करार होईपर्यंत आर्थिक आणि लष्करी दबाव कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एकूणच, परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची आहे, एका बाजूला तीव्र वक्तव्ये आणि दुसऱ्या बाजूला गुप्त कूटनीतिक हालचाली सुरू आहेत. पाकिस्तान या संपूर्ण प्रक्रियेचा केंद्रबिंदू बनला असून, इस्लामाबादमधील आगामी घडामोडी या तणावाला शमवतात की आणखी वाढवतात, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा: Pune Firing Case: पुणे हादरलं! भरदिवसा सलूनमध्ये गोळीबार, दोन जण जखमी; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number