आयपीएलच्या 19 व्या हंगामातील तिसरा सामना राजस्थान रॉयल्सच्या घरच्या मैदानात म्हणजेच गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडणार आहे. हा सामना 30 मार्चला राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. यादरम्यान चेन्नई सुपर किंग्स संघाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्स संघातील एक नव्हे तर तब्बल तीन खेळाडू पहिल्या सामन्याला मुकणार आहेत. चेन्नई सुपर किंग्स संघातील तीन खेळाडू जखमी झाल्यामुळे ते काही सामने खेळणार नाहीत.
यात माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच नाव पहिला समोर आलं होत. धोनीला दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानापासून 2 नाही तर 3 आठवडे दूर रहावं लागणार असून त्याला किमान 5-6 सामन्यांना मुकावं लागू शकतं. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्समधून डेवाल्ड ब्रेविस आणि नॅथन एलिसच्या जागी आलेला स्पेन्सर जॉन्सन हे देखील राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्यातून बाहेर असणार आहेत. ब्रेविसला बरगडीला दुखापत झाली असून स्पेन्सर जॉन्सन हा देखील दुखापतीमुळे अजून संघात सामील झालेला नाही. यामुळे राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाची खेळी कशी असणार हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे. आतापर्यंत आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन्ही संघ एकूण 31 वेळा आमनेसामने आले आहेत. या 31 सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सला 16 सामन्यांत पराभूत केलं तर राजस्थान रॉयल्सने 15 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या दोन्ही संघात काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा- IPL 2026 MI vs KKR : पहिल्याच सामन्यात चमकला MI चा लोकल बॉय; घरच्या मैदानावर ठरला मॅन ऑफ द मॅच
चेन्नई सुपर किंग्स संघातील 3 दिग्गज संघाबाहेर
आयपीएलच्या इतिहासात असं पहिल्यांदा होणार आहे, ज्यात चेन्नई सुपर किंग्स संघातील तीन दिग्गज खेळताना दिसणार नाही. यात एम.एस. धोनी, सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा हे खेळाडू आहेत. एम.एस. धोनी, सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा या तिघांनीही 2008 पासून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होत. एम.एस. धोनी आणि सुरेश रैना यांनी सुरुवातीपासूनच चेन्नई सुपर किंग्स संघातून आयपीएल स्पर्धांमध्ये आपली कामगिरी बजावली. तर रवींद्र जडेजा याने राजस्थान रॉयल्स या संघातून पदार्पण केले. तसेच नंतर, तो चेन्नई सुपर किंग्सचा आधारस्तंभ बनला. त्यानंतर आता आयपीएल 2026 च्या 19 व्या हंगामात तो पुन्हा राजस्थान रॉयल्समधून चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध खेळणार आहे. सुरेश रैनाने 6 सप्टेंबर 2022 रोजी आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटसह क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. 2022 च्या लिलावातून वगळण्यात आल्यानंतर, चेन्नई सुपर किंग्सच्या या माजी स्टार खेळाडूने लीग सोडण्याची घोषणा केली. त्यानंतर आता तो चेन्नई सुपर किंग्स संघात प्रशिक्षक म्हणून परतणार आहे.