आयपीएल 2026 स्पर्धेची जोरदार चर्चा रंगली असताना इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी लिलाव कधी पार पडणार याकडे क्रिकेटप्रेमींच लक्ष लागलं होत. 16 डिसेंबरला मिनी लिलाव प्रक्रिया दुबईमध्ये पार पडणार असून त्याआधी सर्व संघांना कोणत्याही परिस्थितीत आपापल्या रिटेन्शन लिस्ट जाहीर कराव्या लागणार आहेत. त्यामुळे कोणत्या संघांनी कोणत्या खेळाडूंना रिलीज केले आहे आणि कोणत्या खेळाडूंना रिटेन केले आहे हे स्पष्ट होईल. दरम्यान प्रत्येक संघाने आपले रिटेन खेळाडू आणि रिलीझ खेळाडूंची यादी जाहीर केली.
यावेळी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएलमधील सर्वात मोठी ट्रेड डील झाली. राजस्थाने संजू सॅमसमसनची ट्रेड डील ही चेन्नईसोबत केली असून चेन्नईच्या रवींद्र जडेजा आणि सॅम करनला राजस्थानने आपल्या संघात सामिल केल आहे. अस असताना आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. राजस्थान रॉयल्सने त्यांच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली असून कुमार संघकारा हे पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत. तर यापूर्वी राजस्थानची कोच म्हणून जबाबदारी ही राहुल द्रविड यांनी पार पाडली होती.
आयपीएल 2026 साठी राजस्थान रॉयल्सचे रिटेन खेळाडू: रवींद्र जडेजा (ट्रेड-इन), सॅम कुरन (ट्रेड-इन), यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, शुभम दुबे, युधवीर सिंग, जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा, क्वेन मफाका, तुषार देशपांडे
आयपीएल 2026 साठी राजस्थान रॉयल्सचे रिलीझ खेळाडू: संजू सॅमसन (ट्रेड), नितीश राणा (ट्रेड), वानिंदू हसरंगा, महेश तिक्षाना, फजलहक फारुकी, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, कुणाल राठोड, अशोक शर्मा.