राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2026 च्या महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानावर धूळ चारत शानदार विजय मिळवला आहे. यानंतर आयपीएल 2026 च्या यंदाच्या सीझनमधील प्लेऑफचे 4 संघ मिळाले आहेत. राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये पोहोचणारी चौथी टीम ठरली असून साखळी फेरीतील त्यांचा प्रवास विजयाने संपला आहे.
28 मार्च रोजी सुरु झालेल्या आयपीएल 2026 चा सीझन निर्णायक टप्प्यात आला आहे. यावेळी प्लेऑफसाठी राजस्थान रॉयल्ससह गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या संघांनी आपले स्थान निर्माण केले आहे. दरम्यान प्लेऑफ फेरीचे वेळापत्रक आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आले आहे. त्यानुसार क्वालिफायर 1 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आमनेसामने येणार आहेत.
पॉंईंट टेबलनुसार सध्या पहिल्या स्थानावर आरसीबी आहे त्यानंतर गुजरात टायटन्स त्यामुळे या दोन्ही संघांमध्ये क्वालिफायर-1 चा सामना होणार आहे. तसेच एलिमिनेटरचा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. आरसीबी आणि गुजरात यांच्यातील सामना जो संघ जिंकेल तो थेट अंतिम सामन्यात जाईल. तर पराभूत झालेला संघ क्वालिफायर2 सामन्यात जाईल. यावेळी राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील विजयी संघ क्वालिफायर2 झालेल्या संघासोबत पुन्हा आमनेसामने येईल. त्यानंतर यांच्यामधून एक संघ अंतिम सामन्यात धडक देईल. त्यानंतर अंतिम सामन्याची लढत पाहायला मिळेल.
4️⃣ teams. 1️⃣ winner All roads lead to the ultimate glory ?#TATAIPL | #TheFinalLeap pic.twitter.com/waI2u61Q4t — IndianPremierLeague (@IPL) May 24, 2026