IPL 2026: राजस्थानच्या एका विजयाने चार संघांचं स्वप्न भंगणार? KKR-CSK चं भवितव्य आता मुंबईच्या हातात

आयपीएल 2026 च्या प्ले-ऑफसाठीची लढत अधिक रंगतदार झाली आहे.

IPL 2026: राजस्थानच्या एका विजयाने चार संघांचं स्वप्न भंगणार? KKR-CSK चं भवितव्य आता मुंबईच्या हातात

आयपीएल 2026 चा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्ले-ऑफसाठीची चुरस दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत आहे. तीन संघांनी आधीच पुढील फेरी गाठली असली तरी चौथ्या स्थानासाठी अजूनही पाच संघांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सवर महत्त्वाचा विजय मिळवल्यानंतर प्ले-ऑफचं गणित आणखी गुंतागुंतीचं झालं आहे.

बुधवारी झालेल्या सामन्यात केकेआरने मुंबईला पराभूत करत आपली आशा कायम ठेवली. या विजयामुळे कोलकाताच्या खात्यात १३ सामन्यांत १३ गुण जमा झाले आहेत. विशेष म्हणजे हंगामाच्या सुरुवातीला सलग अपयशाचा सामना करणाऱ्या केकेआरने दमदार पुनरागमन करत पुढील सात सामन्यांपैकी सहा सामने जिंकले. मात्र, एवढं करूनही त्यांचं भवितव्य पूर्णपणे त्यांच्या हातात नाही.

हेही वाचा: Vaibhav Sooryavanshi In IPL 2026 : सूर्यवंशीच्या शानदार 93 धावा, राजस्थान रॉयल्सच्या प्लेऑफच्या आशा जीवंत; लखनौविरोधात 7 गडी राखून दणदणीत विजय

केकेआरला प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी दिल्लीविरुद्धचा शेवटचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. पण त्याचबरोबर राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्या निकालांवरही त्यांचं भविष्य ठरणार आहे. राजस्थानने मुंबईविरुद्ध विजय मिळवला तर केकेआरसह चेन्नई, दिल्ली आणि पंजाब यांची प्ले-ऑफची आशा संपुष्टात येऊ शकते.

राजस्थानच्या खात्यात सध्या 13 सामन्यांत 14 गुण आहेत. त्यामुळे मुंबईविरुद्धचा विजय त्यांना थेट प्ले-ऑफमध्ये पोहोचवू शकतो. त्यामुळे आगामी राजस्थान विरुद्ध मुंबई सामना हा या हंगामातील सर्वात निर्णायक सामन्यांपैकी एक ठरणार आहे.

हेही वाचा: BCCI Domestic Season: BCCI कडून देशांतर्गत हंगामाचे वेळापत्रक जाहीर; दिलीप करंडकाने होणार सुरुवात; 1700 हून अधिक सामने अन्…

दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जची स्थितीही अत्यंत कठीण झाली आहे. गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर असलेल्या सीएसकेला केवळ स्वतःचा शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकून भागणार नाही, तर इतर संघांच्या पराभवासाठीही प्रार्थना करावी लागणार आहे. मुंबईने राजस्थानचा पराभव करणे, तसेच केकेआर, पंजाब आणि दिल्ली यांनी आपापले शेवटचे सामने गमावणे, हे चेन्नईसाठी अत्यावश्यक ठरणार आहे.

या सर्व समीकरणांमुळे आयपीएल 2026 चा शेवटचा आठवडा अत्यंत रोमांचक बनला आहे. प्रत्येक सामना आता प्ले-ऑफच्या दृष्टीने निर्णायक ठरत असून क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोणता संघ शेवटची जागा पटकावणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number