MI vs CSK: हार्दिक नाही, रोहित शर्मा परत कर्णधार होणार?

मुंबई इंडियन्सने कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची नियुक्ती केली आहे. पण तो आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही.

MI vs CSK: हार्दिक नाही, रोहित शर्मा परत कर्णधार होणार?

बीसीसीआयने आयपीएल 2025 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. या वेळापत्रकारनुसार, पहिला सामना 22 मार्चला गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगणार आहे. तर मुंबई इंडियन्सची गाठ चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. 23 मार्च रोजी 5 वेळचे विजेते संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात हा हाय-व्होल्टेज सामना होणार आहे. चेन्नई विरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. 

 

हेही वाचा –  मुजीब उर रहमान गझनफरची जागा घेतली, मुंबई इंडियन्सच्या संघात महत्त्वाचा बदल

हार्दिक पांड्या पहिला सामना खेळणार नाही?
मुंबई इंडियन्सने कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची नियुक्ती केली आहे. पण तो आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. आयपीएल 2024 हंगामातील अखेरच्या साखळी सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध स्लो ओव्हर रेटमुळे हार्दिकवर 30 लाख रूपये दंड आणि एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे तो चेन्नईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात उपलब्ध नसणार आहे. हार्दिक 29 मार्चला गुजरात टायटन्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात पुनरागमन करणार आहे. 

हेही वाचा – IPL 2025: वेळापत्रक जाहीर, 8 संघांचे कर्णधार ठरले, पण KKR आणि DC कर्णधार कोण?

 

हार्दिकच्या अनुपस्थितीत रोहित, सुर्या, बुमराह शर्यतीत 
हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाची जबाबदारी कोण घेणार, याची उत्सुकता सर्वांना आहे. कारण मुंबईच्या संघात अनुभवी खेळाडूंची कमी नाही. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह हे तिघेही मुंबईचे कर्णधारपद सक्षमपणे सांभाळू शकतात. रोहित शर्माने पूर्वीच्या 5 विजेत्या हंगामांत मुंबई संघाचे नेतृत्व केले आहे. तर सूर्यकुमार यादव सध्या टीम इंडियाच्या टी-20 संघाचा कर्णधार आहे. याशिवाय जसप्रीत बुमराह हा भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. या तिघांमध्ये विचार केल्यास मुंबईची जबाबदारी ही एका सामन्यासाठी रोहित शर्माकडं येण्याची दाट शक्यता आहे. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number