‘हल्ल्याची चौकशी सीबीआयकडे द्या’

भाजप नेते किरीट सोमैया खार पोलीस ठाण्यात राणा दाम्पत्यास भेटण्यास गेले. त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यामुळे मुंबईत झालेल्या हल्ल्याप्रकरणी सोमैयांनी केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. तसेच या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाला लक्ष घालण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, हल्ल्याप्रकरणी सोमैयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. किरीट सोमैयांनी मुंबई पोलीस आयुक्त आणि गृहमंत्र्यांविरोधात न्यायालयात याचिका दाखल […]

‘हल्ल्याची चौकशी सीबीआयकडे द्या’

भाजप नेते किरीट सोमैया खार पोलीस ठाण्यात राणा दाम्पत्यास भेटण्यास गेले. त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यामुळे मुंबईत झालेल्या हल्ल्याप्रकरणी सोमैयांनी केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. तसेच या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाला लक्ष घालण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, हल्ल्याप्रकरणी सोमैयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

किरीट सोमैयांनी मुंबई पोलीस आयुक्त आणि गृहमंत्र्यांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. माझ्यावरील हल्ल्याप्रकरणी सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सोमैयांनी केली आहे. तसेच हल्ला करणाऱ्या शिवसेनेच्या ८० गुंडांना अटक करण्याची मागणीही सोमैयांनी याचिकेद्वारे केली आहे.

मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि मुंबई पोलीस आयुक्त खोटे एफआयआर दाखल करतात. खार पोलीस ठाण्याच्या बाहेर शिवसेनेच्या ८० गुंडांनी माझ्यावर हल्ला केला. त्यामुळे या गुंडांना अटक करण्याची मागणी तसेच हे हल्लाप्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे देण्याची मागणी करणारी याचिका मी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे, अशी माहिती किरीट सोमैया यांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण?

भाजप नेते किरीट सोमैया खार पोलीस ठाण्यात राणा दाम्पत्यास भेटण्यास गेले होते. त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यावेळी त्यांच्या हनुवठीला जखम झाली होती. त्यामुळे मुंबईत झालेल्या हल्ल्यामुळे सोमैयांनी केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. तसेच या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाला लक्ष घालण्याची मागणी त्यांनी केली.

दरम्यान, किरीट सोमैयांना गंभीर दुखापत झाली नसल्याचे भाभा रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. सोमैया यांना किरकोळ जखम झाली असून ती फक्त ०.१ सेंटिमीटरची जखम आहे, सोमैया यांना गंभीर इजा नाही असे भाभा रुग्णालयातील अहवालात म्हंटले आहे. तसेच, सोमैयांच्या चेहऱ्यावर कोणतीही सूज नाही आणि जखमेमुळे रक्तस्त्राव झालेला नाही असेही या अहवालात म्हटलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number