कोल्हापुरात आक्षेपार्ह स्टेटस वरून दंगल उसळली. त्यानंतर कायदा व सुव्यवस्थेसाठी बुधवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. गुरुवारी रात्री 12 पर्यंत इंटरने बदचे आदेश दिले होते. मात्र, अद्यापदेखील इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोल्हापूरमध्ये इंटरनेट सेवा कधी सुरू होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
काेल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही भागात अद्याप इंटरनेट सेवा बंद असल्याने युवा वर्गाची विशेषत: नाेकरदार वर्गाची माेठी अडचण झाली आहे. जे नाेकरदार वर्क फ्राॅम हाेम या माध्यमातून कार्यरत आहेत ते काेल्हापूर पाेलिसांना ट्विट करुन इंटरनेट सेवा कधी सुरु हाेणार याची विचारणा करु लागले आहेत.
दरम्यान, इंटरनेट बंद असल्यामुळे डिजिटल व्यवहारावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक डिजिटल व्यवहार ठप्प झाले आहेत. तसेच इंटरनेट बंद असल्यामुळे अनेकांसाठी मनोरंजनाचे साधन बंद झाले आहेत. त्यामुळे प्रत्येकाला इंटरनेट सेवा पुन्हा कधी सुरू होणार याकडे लक्ष लागले आहे.
काेल्हापूर शहर आणि परिसरात शांतता निर्माण करण्यासाठी पाेलिसांची जादा कुमक मागविण्यात आली आहे. याबराेबरच गेले दाेन दिवस शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्याचे निर्देश इंटरनेट पूरवठाधारक कंपन्यांना देण्यात आले. त्यामुळे काेल्हापूर आणि ग्रामीण भागातील इंटरनेट सेवेवर बंधन आली. सर्वच कंपन्यांनी सुविधा बंद ठेवली. त्याचा परिणाम व्यवसाय, बॅंकांवर झाला. सर्वांता माेठी परिणाम युवा वर्गावर झाला.