मुसळधार पावसामुळे कोल्हापूर आणि सांगलीत पूरस्थिती झाली असून नागरिकांना वाचवण्यासाठी बचावकार्य मोहीम सुरू आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पुराची पाहणी करतानाचा सेल्फी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमुळे विरोधकांनी गिरीश महाजनांवर प्रचंड टीका केली. गिरीश महाजन यांनी एक नवीन व्हिडीओ शेअर केला असून विरोधाकांचे ट्रोल करुन झाले असेल तर बचावकार्यासाठी मदत करावी असा टोला लगावला आहे.
विरोधकांनी गिरीश महाजनांवर टीका केल्यानंतर बचावकार्यावेळी मदत करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
सांगलीच्या पूरग्रस्त भागांमध्ये कुठलीही मदत पोहोचली नव्हती.
भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांसोबत आपत्तीग्रस्तांपर्यंत पोहोचलो असून रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आहे.
या बचावकार्यात गिरीश महाजन मदत करताना दिसत आहे.
आज सांगली मधील ज्या पूरग्रस्त भागांमध्ये आतापर्यंत कोणतीही मदत पोचली नव्हतीं, त्या ठिकाणी भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत आपत्तीग्रस्त पर्यंत पोचलेले आहोत व त्यांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेले आहे. #maharashtrafloods pic.twitter.com/XsVXlmFkF3 — Girish Mahajan (@girishdmahajan) August 9, 2019
तसेच मदतकार्याचे राजकारण करणारे विरोधकांनी घरात बसून टीका करण्याऐवजी घटनास्थळी येऊन मदत करवी असेही ट्विट करत म्हटलं.
&
गेल्या ४ दिवसांपासून मदत न मिळालेल्या गावांत आज पोहोचलो.
मदतकार्याचे राजकारण करणाऱ्या विरोधी पक्षांतील नेत्यांना मी विनंती करतो की आपले घरात बसून टीका-ट्रोलिंग करत मनोरंजन झाले असेल तर येऊन प्रत्यक्ष मदतकार्यात सहभागी व्हावे! #maharashtrafloods #MaharashtraRains #Kolhapurfloods pic.twitter.com/oA7tvnbEAh — Girish Mahajan (@girishdmahajan) August 9, 2019