मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतातील सर्वात मोठी खाजगी विमान कंपनी इंडिगोने प्रवाशांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. मध्यपूर्व आणि तुर्कीतील इस्तंबूल येथे जाणाऱ्या किंवा येणाऱ्या उड्डाणांसाठी तिकीट रद्द केल्यास 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण शुल्कमाफी (Full Waiver on Cancellation) देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. वाढत्या संघर्षामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मध्यपूर्वेतील घडामोडींवर इंडिगो सतत लक्ष ठेवून आहे आणि परिस्थितीनुसार आपल्या वेबसाइट तसेच सोशल मीडिया माध्यमांवर प्रवाशांना अद्ययावत माहिती दिली जात आहे. “मध्यपूर्व आणि इस्तंबूल येथे प्रवास करणाऱ्या किंवा तेथून येणाऱ्या उड्डाणांसाठी 31 मार्च 2026 पर्यंत रद्द केल्यानंतर पूर्ण शुल्कमाफी देण्यात येत आहे,” असे कंपनीने अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त हल्ला केल्यानंतर निर्माण झालेल्या संघर्षामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे. त्यानंतर इराणनेही प्रत्युत्तर दिल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली. या पार्श्वभूमीवर इंडिगो आणि एअर इंडिया या भारतीय विमान कंपन्यांनी मध्यपूर्वेतील अनेक गंतव्यस्थानांसाठीची उड्डाणे तात्पुरती स्थगित केली होती.
Travel Advisory As the situation in Middle East remains volatile, IndiGo extends free waivers on cancellations up till the 31st of March 2026. ? Waivers – Full waiver on cancellations are being extended for travel to and from the Middle East, and Istanbul, until 31 March 2026… — IndiGo (@IndiGo6E) March 6, 2026
तथापि, परिस्थिती हळूहळू सुरळीत करण्यासाठी इंडिगोने काही मर्यादित उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने गुरुवारी दिलेल्या स्वतंत्र प्रवास सल्ल्यानुसार 6 मार्च 2026 रोजी मध्यपूर्वेतील आठ गंतव्यस्थानांसाठी 17 उड्डाणे (एकूण 34 सेक्टर) चालवली जाणार आहेत. या उड्डाणांबाबत संबंधित प्रवाशांशी थेट संपर्क साधला जाणार असून त्यांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा ई-मेलद्वारे माहिती दिली जाईल.
Travel Advisory We are closely monitoring the dynamically evolving situation in and around the Middle East, and are working with the government authorities to gradually and safely restore flight operations to and from the region. On 6th March 2026, IndiGo will operate 17… pic.twitter.com/FcK17alURb — IndiGo (@IndiGo6E) March 5, 2026
कंपनीने प्रवाशांना विनंती केली आहे की, अधिकृत सूचना मिळाल्याशिवाय विमानतळावर जाऊ नये. उड्डाणांच्या अद्ययावत माहितीसाठी प्रवाशांनी नियमितपणे फ्लाइट स्टेटस तपासण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. जर एखादे उड्डाण रद्द झाले असेल तर प्रवाशांना पर्यायी उड्डाण निवडण्याची किंवा परतावा (Refund) मिळवण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था Bloomberg च्या अहवालानुसार मध्यपूर्वेतील संघर्षामुळे जागतिक विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. Cirium Ltd या एव्हिएशन डेटा विश्लेषण संस्थेच्या माहितीनुसार 28 फेब्रुवारीपासून मध्यपूर्वेकडे जाणारी किंवा तेथून येणारी 51,600 उड्डाणे नियोजित होती, त्यापैकी अर्ध्याहून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. एकूण सुमारे 27,000 उड्डाणे रद्द झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर परिस्थिती स्थिर होईपर्यंत विमान कंपन्या सावध भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा: Kaju chi Bhaji : घरच्याघरी मालवणी स्टाईल बनवा ओल्या काजूगराची भाजी, जाणून घ्या रेसिपी