IND vs PAK: भारताचा पुन्हा एकदा दणदणीत विजय, पाकिस्तानला सहा विकेट्सने लोळवलं

आशिया कपमध्ये भारतीय संघाने पुन्हा एकदा पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. पाकिस्तानने दिलेलं 172 रनचं आव्हान टीम इंडियाने 18.5 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पार केलं.

IND vs PAK: भारताचा पुन्हा एकदा दणदणीत विजय, पाकिस्तानला सहा विकेट्सने लोळवलं

दुबई: आशिया कपमध्ये भारतीय संघाने पुन्हा एकदा पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. पाकिस्तानने दिलेलं 172 रनचं आव्हान टीम इंडियाने 18.5 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पार केलं. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी उत्तम काामगिरी केली आहे. अभिषेक शर्माने 39 बॉलमध्ये 74 रन केले. 189.74 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत अभिषेकने 6 फोर आणि 5 सिक्स लगावल्या. तर शुभमन गिलने 167.86 च्या स्ट्राईक रेटने 28 बॉलमध्ये 47 रन केले. गिलने त्याच्या खेळीमध्ये 8 तडाखेबंद फोर मारल्या. तिलक वर्माने 19 बॉलमध्ये नाबाद 30 आणि हार्दिक पांड्याने नाबाद 7 रन केले.

गिल आणि अभिषेक यांच्यात 9.5 ओव्हरमध्येच 105 रन झाल्या. या दोघांच्या पार्टनरशीपनंतर मात्र भारतीय संघाला बॅटिंग करताना थोडा संघर्ष करावा लागला. सूर्यकुमार यादव 0 रनवर तर संजू सॅमसन 17 बॉलमध्ये 13 रन करून आऊट झाला. पाकिस्तानकडून हारिस राऊफला 2, अबरार अहमद-फहीम अश्रफला 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

हेही वाचा: IND vs PAK: कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकली; भारत प्रथम गोलंदाजी करणार
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताने पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 171/5 वर रोखलं. पाकिस्तान संघाकडून साहिबझादा फरहानने 45 बॉलमध्ये 58 रन केले. तर फहीम अश्रफने 8 बॉलमध्ये नाबाद 21 रन करून पाकिस्तानला 170 च्या पुढे नेलं. भारताकडून शिवम दुबेला 2 विकेट मिळाल्या, याशिवाय कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्याला 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विजय मिळाल्यानंतर टीम इंडिया आशिया कपच्या फायनलच्या जवळ पोहोचली आहे. भारतीय संघाचे उरलेले सामने बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध आहेत. यापैकी एका सामन्यात विजय मिळालाा तरीही टीम इंडिया फायनलमध्ये पोहचणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number