IND Vs NZ Cricket Match: दुखापतीचे ग्रहण संपेना; न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा झटका

विजयाचा निर्धार करून मैदानात उतरणाऱ्या भारतीय संघासाठी हा मोठा मानसिक धक्का मानला जात आहे.

IND Vs NZ Cricket Match: दुखापतीचे ग्रहण संपेना; न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा झटका

वडोदरा: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हाय-व्होल्टेज एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. मात्र, पहिला सामना सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाच्या गोटातून एक अत्यंत निराशाजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा यष्टीरक्षक आणि स्टार फलंदाज ऋषभ पंत दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. विजयाचा निर्धार करून मैदानात उतरणाऱ्या भारतीय संघासाठी हा मोठा मानसिक धक्का मानला जात आहे.

आज 11 जानेवारी रोजी वडोदरा येथील कोटंबी स्टेडियमवर मालिकेतील पहिला सामना रंगणार आहे. या ऐतिहासिक सामन्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक असतानाच, पंतच्या दुखापतीच्या बातमीने क्रिकेटप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सरावादरम्यान फलंदाजीचा सराव करत असताना पंतच्या पाठीच्या वरच्या भागात आणि बरगड्यांजवळ अचानक दुखापत झाली. फिजिओने त्याची तातडीने तपासणी केली, त्यानंतर वेदना असह्य असल्याने त्याला मैदान सोडावे लागले.

हेही वाचा: Social Media Law: भारत सरकारच्या एका पत्रानं 'X' हादरलं, आता 'या' नियमाचे पालन करणे अनिवार्य

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतला उजव्या बाजूला 'इंटर्नल ऑब्लिक मसल' (स्नायू) दुखापत झाली आहे. या गंभीर दुखापतीमुळे तो आगामी तीनही सामन्यांच्या मालिकेत खेळू शकणार नाही. भीषण अपघातातून सावरून मैदानावर परतलेला पंत फॉर्ममध्ये येण्यासाठी प्रयत्न करत होता, मात्र या नव्या दुखापतीने त्याच्या पुनरागमनाच्या मार्गात पुन्हा एकदा अडथळा निर्माण केला आहे. 2024 मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा वनडे खेळलेल्या पंतला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

ऋषभ पंतच्या अनुपस्थितीमुळे आता यष्टीरक्षणाची धुरा कोणाकडे असेल, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. बीसीसीआयने अद्याप अधिकृत बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही, परंतु सूत्रांनुसार ध्रुव जुरेल किंवा इशान किशन यांपैकी एकाला संघात स्थान मिळू शकते. ध्रुव जुरेलने अलीकडच्या काळात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली आहे, त्यामुळे त्याला प्राधान्य मिळण्याची शक्यता अधिक आहे.

वडोदरा क्रिकेट असोसिएशनच्या या नवीन मैदानावर खेळवला जाणारा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय पुरुष सामना आहे. ऐतिहासिक क्षणाची साक्ष देण्यासाठी सज्ज असलेल्या चाहत्यांसाठी पंतचे संघाबाहेर जाणे ही मोठी पोकळी ठरणार आहे. आता कर्णधार आणि संघ व्यवस्थापन या संकटातून मार्ग काढून न्यूझीलंडच्या आव्हानाला कसे सामोरे जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा:  Ajit Pawar : फडणवीस की शिंदे! अजित पवारांना जास्त जवळचं कोण? म्हणाले, "मला एवढ समजल की दोघेही"

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number