भारताने कॅनडाला खडसावले

भारताने कॅनडाच्या उच्चायुक्तांना देश सोडण्याचा आदेश दिला आहे. तसेच कॅनडातील उच्चायुक्त संजय वर्मा यांना परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. 

भारताने कॅनडाला खडसावले

नवी दिल्ली : खलिस्तानी अतिरेकी संघटना शीख फॉर जस्टिसकडून भारताच्या उच्चायुक्तांना धमकावण्यात आले. कॅनडा सरकारने पुन्हा एकदा खलिस्तान समर्थक हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येचा आरोप भारतावर लावला. भारताने कॅनडाचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत ते फेटाळले. पण कॅनडा सरकारच्या भूमिकेमुळे भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव वाढला आहे. यानंतर भारताने कॅनडाच्या उच्चायुक्तांना देश सोडण्याचा आदेश दिला आहे. तसेच कॅनडातील उच्चायुक्त संजय वर्मा यांना परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. 

  1. कॅनडाच्या उच्चायुक्तांना भारताने माघारी बोलावले 
  2. उच्चायुक्त संजय वर्मा परतणार 
  3. निज्जर हत्येप्रकरणी भारताची भूमिका

काय आहे प्रकरण ? 

  1. खलिस्तान समर्थक हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येचा आरोप कॅनडानं भारतावर लावला.
  2. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी याबाबतचे वादग्रस्त विधान केले.
  3. भारताने कॅनडाचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत ते आरोप फेटाळून लावले.
  4. यामुळे दोन्ही देशातील संबंध तणावपूर्ण झाले. 
  5. दरम्यान भारतीय उच्चायुक्त आणि राजनैतिक अधिकाऱ्यांना कॅनडानं 'पर्सन ऑफ इंटरेस्ट' ठरवलं.
  6. यामुळे संतापलेल्या भारताने अखेर हे टोकाचं पाऊल उचललं आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number