Gokul Gite In Shivsena : अपक्ष आमदार गोकुळ गीते शिवसेनेचे सहयोगी सदस्य; एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर गीतेंची भूमिका स्पष्ट

मुंबई : नाशिक विधानपरिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी विजय मिळवल्यानंतर सोमवारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. विशेष म्हणजे त्यांच्याच पक्षातील उमेदवाराला पराभूत करून गीते यांनी निवडणूक जिंकली. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत गोकुळ गीते यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला. शिवसेनेचे मुख्यनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भविष्यात ‘शिवसेना सहयोगी सदस्य’ म्हणून […]

Gokul Gite In Shivsena : अपक्ष आमदार गोकुळ गीते शिवसेनेचे सहयोगी सदस्य; एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर गीतेंची भूमिका स्पष्ट

मुंबई : नाशिक विधानपरिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी विजय मिळवल्यानंतर सोमवारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. विशेष म्हणजे त्यांच्याच पक्षातील उमेदवाराला पराभूत करून गीते यांनी निवडणूक जिंकली. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत गोकुळ गीते यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला. शिवसेनेचे मुख्यनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भविष्यात ‘शिवसेना सहयोगी सदस्य’ म्हणून काम करणार असल्याचे यावेळी गोकुळ गीते यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर केले.

हेही वाचा : Shamir Patel Disqualified : ठाकरे गटाच्या नगरसेवकानंतर आता एमआयएमच्या नगरसेवकाचेही पद रद्द; पोटनिवडणुकीची शक्यता

गोकुळ गीते यांच्यासारखे जनाधार असलेले नेतृत्व शिवसेनेसोबत येणे ही त्याचीच प्रचिती आहे, असे मत यावेळी उपस्थित असलेले शिवसेनेचे संसदीय गटनेते व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. यावेळी गोकुळ गीते यांनी शिवसेनेसमवेत सहयोगी सदस्य म्हणून काम करण्याबरोबरच संघटनेसाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धारही व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे संसदीय गटनेते व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, आमदार किशोर पाटील, चंद्रकांत रघुवंशी, शिवसेना उपनेते, माजी खासदार राहुल शेवाळे, राज्य संघटन प्रमुख आनंद परांजपे, माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number