वर्ध्यात अंत्यविधीसाठी पैसे नसल्याने घरातच पुरला मुलीचा मृतदेह

  वर्धा १४ जुलै २०२३,प्रतिनिधी – महिला अत्याचाराच्या अनेक घटना ताज्या असताना वर्ध्यामध्ये हृदय पिळवटून टाकणारी एक घटना समोर आली आहे. वर्ध्यात पैसे नसल्याने पोटच्या मुलीचा मृतदेह चक्क घरातच पुरल्याची घटना समोर आली आहे . आठ दिवसांपूर्वी स्वयंपाकघरात पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडण्यात सेवाग्राम पोलिसांना अखेर यश आलं आहे. मुलीच्या अंत्यविधीसाठी पैसे नसल्याने मुलीचा मृतदेह घरातच […]

वर्ध्यात अंत्यविधीसाठी पैसे नसल्याने घरातच पुरला मुलीचा मृतदेह

 

वर्धा १४ जुलै २०२३,प्रतिनिधी – महिला अत्याचाराच्या अनेक घटना ताज्या असताना वर्ध्यामध्ये हृदय पिळवटून टाकणारी एक घटना समोर आली आहे. वर्ध्यात पैसे नसल्याने पोटच्या मुलीचा मृतदेह चक्क घरातच पुरल्याची घटना समोर आली आहे . आठ दिवसांपूर्वी स्वयंपाकघरात पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडण्यात सेवाग्राम पोलिसांना अखेर यश आलं आहे. मुलीच्या अंत्यविधीसाठी पैसे नसल्याने मुलीचा मृतदेह घरातच पुरला असल्याची धक्कादायक कबुली वडील साहेबराव भस्मे यांनी दिली आहे. साहेबराव भस्मे आपल्या परिवारासह सेवाग्राम येथे राहत होते त्यांच्या परिवारात त्यांची पत्नी मुलगा प्रशांत ३६ वर्षे, मुलगी प्रणिता ३८ वर्षे असा ४ जणांचा परिवार होता.

प्रणिता मानसिक रोगी होती, तिची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ४ जुलैला अचानक प्रणिताची प्रकृती बिघाल्याने तिचा मृत्यू झाला. तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नसल्याने वडील साहेबराव, आणि त्यांच्या पत्नीने घरातच खड्डा करून मुलीचा मृतदेह पुरला. पण शेजारच्यांनी प्रणिता काही दिवसांपासून दिसली नसल्याने त्यांनी हि माहिती ताबडतोब सेवाग्राम पोलिसांना दिली, पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी न्याय दंडाधिकारी उपस्थित पाहिजे होते, म्हणून तहसीलदार रमेश कोळपे. नायब तहसीलदार बाळू भागवत. सेवाग्राम ठाणेदार चकाटे हे सर्व घटनास्थळी उपस्थित होते.

मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळून आला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदन करून पुन्हा त्याच ठिकाणी मृतदेह पुरण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number