Sangli Crime : आधी धारदार शस्त्राने वार केला, नंतर बॅरलमध्ये कोंबलं…; सांगलीतील या घटनेने परिसरात खळबळ

सांगली : सांगलीतील इंदिरानगरमधून सात दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला बांधकाम कामगार रोहित म्हैसाळे (वय २९) याचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे गुरुवारी उघडकीस आले. खुनानंतर रोहितचा मृतदेह एका बॅरलमध्ये टाकून त्यात दगड भरून तो विठ्ठलनगरमधील पडीक विहिरीत टाकण्यात आला होता. पोलिसांनी सडलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढला. या खूनप्रकरणी दोन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून […]

Sangli Crime : आधी धारदार शस्त्राने वार केला, नंतर बॅरलमध्ये कोंबलं…; सांगलीतील या घटनेने परिसरात खळबळ

सांगली : सांगलीतील इंदिरानगरमधून सात दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला बांधकाम कामगार रोहित म्हैसाळे (वय २९) याचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे गुरुवारी उघडकीस आले. खुनानंतर रोहितचा मृतदेह एका बॅरलमध्ये टाकून त्यात दगड भरून तो विठ्ठलनगरमधील पडीक विहिरीत टाकण्यात आला होता. पोलिसांनी सडलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढला. या खूनप्रकरणी दोन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून एकजण पसार झाल्याची माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली आहे. पूर्ववैमनस्यातून खून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. परंतु, या खुनामागे वेगळे कारण असल्याच्या शक्यतेने तपास सुरू केला आहे. संशयितांनी रोहितचा खून केल्यानंतर त्याचे तोंड व हात-पाय बांधले. मृतदेह कापडात गुंडाळून बेरलमध्ये कोंबला. पाण्यात बॅरल तरंगू नये म्हणून दगडाने भरले. त्यावर झाकण लावून बॅरल विहिरीत फेकला होता, असे पोलीस तपासात आढळून आले आहे. 

हेही वाचा : Nagpur Shocking Incident: अंगावर रंग उडवला म्हणून संताप; सख्ख्या आजीनेच नातवावर उकळतं पाणी ओतलं, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number