जोगेश्वरीत लागलेली आग अखेर आटोक्यात आलेली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निश्मन दलाच्या जवानांना यश आले आहे.
जोगेश्वरीत गुरुवारी सकाळच्या सुमारास गोदामाला भीषण आग लागली होती. या आगीची माहिती मिळताच, अग्निश्मन दलाने घटनास्थळी पाचारण केलं. घटनास्थळी अग्निश्मन दलाच्या ७ बंब दाखल झाले होते.
घटनास्थळी गेल्या २ तासांपासून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु होते.
या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहाणी झालेली नाही.
दरम्यान या आगीचं कारण समजू शकलेलं नाही.