पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) संस्थापक आणि माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) याची बहीण नुरीन नियाझी (Noreen Niazi) हिने इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर जमणाऱ्या कार्यकर्त्यांना गंभीर इशारा दिला आहे. तिच्या मते, समर्थकांनी रस्त्यावर उतरणे म्हणजे पूर्वी झालेल्या कारवाईप्रमाणेच आयुष्य जोखिमेत घालण्यासारखे आहे. तिने आठवण करून दिले की 9 मे 2023 रोजीच्या आंदोलनात अनेकांना गोळ्या लागल्या आणि काहींचा मृत्यूही झाला. ANI शी बोलताना तिने सांगितले, “मोठ्या आंदोलनावेळी असंख्य लोकांना गोळ्या मारल्या गेल्या. त्यांचे मृतदेह लपवले गेले.”
तिच्या मते 9 मे रोजी ती स्वतः घटनास्थळी उपस्थित होती आणि सुरक्षा दलांनी नागरिकांना लक्ष्य केल्याचे तिने प्रत्यक्ष पाहिले. “स्नायपर्सने लोकांवर गोळ्या झाडल्या. अगदी मुलांच्या डोक्यावरही गोळ्या मारल्या,” असा गंभीर आरोप तिने केला. या सर्व आठवणी असूनही, इम्रान खानच्या समर्थनार्थ लोक अजूनही रस्त्यावर उतरतात, याकडे तिने लक्ष वेधले. तिच्या मते, इम्रान खान तुरुंगात असूनही निर्धार तसूभरही ढळलेला नाही आणि त्याच जिद्दीमुळे समर्थक साथ देत आहेत. ती म्हणते की “अत्यंत दबाव” टाकला जात आहे.” इम्रानला खचवण्यासाठी अत्याचार होत आहेत, जेणेकरून तो म्हणेल ‘मला वाचवा, मी राजकारण सोडतो’, जसे नवाझ शरीफ (Nawaz Sharif) किंवा झरदारीने (Zardari) केले,” असा दावा तिने केला.
हेही वाचा: Hong Kong Fire Tragedy: मानवनिर्मित आपत्ती? हॉंगकॉंग आगीत 94 मृत, रहिवाशांचे गंभीर आरोप
"Countless people were shot": Imran Khan's sister warns supporters of deadly crackdown risks Read @ANI Story | https://t.co/nEpnknN0Ux#ImranKhan #NoreenNiazi #Pakistan pic.twitter.com/y6Y0ofKJH7 — ANI Digital (@ani_digital) November 28, 2025
नियाझीने इम्रान खान याची तुलना इतर राजकारण्यांशी करण्यास नकार दिला. तिच्या मते, “ते एक नेते आहेत, फक्त राजकारणी नाहीत. पंतप्रधान बनण्यापेक्षा देश बदलण्याची इच्छा आहे.” ती पुढे म्हणाली इम्रानला पाकिस्तानमध्ये मिळणारा आदर “पंतप्रधानपदापेक्षाही अधिक” आहे.
इम्रान खान सध्या Adiala Jail मध्ये आहे आणि त्याच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या आहेत. मात्र सरकार आणि PTI नेत्यांनी या सर्व दाव्यांना नाकारत सांगितले की इम्रानला नियमित वैद्यकीय उपचार मिळत आहेत. तरीही भेटीला आलेल्या कुटुंबीयांना, वकिलांना आणि KP Chief Minister Sohail Afridi यांनाही सलग आठ वेळा भेट नाकारण्यात आली, ज्यामुळे संशय अधिक वाढला आहे. “Where is Imran Khan?” हा प्रश्न सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड झाला. इम्रान खानचे पुत्र कासिम (Kasim) यांनी आंतरराष्ट्रीय संस्थांना “proof of life” मागण्याचे आवाहन केले आहे.
Imran Khan is in illegal isolation. People keep asking us about his health and safety, but the truth is, we have no access to anyone who can give us verified information. The media may quote “official statements” from jail authorities, but we do not trust a single word from… — Aleema Khanum (@Aleema_KhanPK) November 27, 2025
दुसरीकडे, सरकारने स्पष्ट केले की इम्रान हा “VIP कैदी” असून आहार, औषधे आणि व्यायामाची विशेष काळजी घेतली जात आहे. दरम्यान, Adiala Jail बाहेर PTI कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरूच आहे. Mehmood Khan Achakzai यासारखे नेतेही या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी पोहोचले. मुख्यमंत्री आफ्रिदीने सांगितले की ते इम्रान खानच्या प्रकृतीबाबत खरी माहिती घेऊ इच्छित होते, परंतु पोलिसांनी त्यांना ‘Factory Naaka’ येथे थांबवले आणि कोणतेही लिखित कारणही दिले नाही.