IMD Weather Alert: तीन महिने कडाक्याची थंडी! IMDचा मोठा इशारा महाराष्ट्रासह 6 राज्यांना अलर्ट

या हिवाळ्यात महाराष्ट्रात कडाक्याची थंडी वाढणार असल्याचा अंदाज IMDने व्यक्त केला आहे.

IMD Weather Alert: तीन महिने कडाक्याची थंडी! IMDचा मोठा इशारा महाराष्ट्रासह 6 राज्यांना अलर्ट

IMD Weather Alert: राज्यात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन कोलमडले असतानाच आता हवामानातील आणखी एका बदलाने राज्यकर्त्यांसह नागरिकांचीही चिंता वाढवली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) जारी केलेल्या नव्या अंदाजानुसार, यंदाचा हिवाळा महाराष्ट्रासाठी अधिक तीव्र राहण्याची शक्यता आहे. डिसेंबरपासून फेब्रुवारीपर्यंतच्या तीन महिन्यांच्या कालावधीत तापमानात मोठी घसरण नोंदवली जाण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानात जाणवणारी घट आता अधिक तीव्र होणार असल्याचे तज्ज्ञ सांगतात. पावसाळ्यानंतर मिळणारी थंडी सामान्य असली, तरी यावर्षी कडाक्याचा प्रभाव अधिक जाणवेल. राज्यातील दिवसरात्र तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दमा–अस्थम्याचे रुग्ण यांच्यासाठी हा काळ अधिक संवेदनशील ठरू शकतो.

हेही वाचा: Mumbai – Delhi AQI: मुंबईमधील प्रदूषण ‘सेफ झोन’कडे; दिल्ली अजूनही प्रदूषणाच्या विळख्यात

IMD च्या अंदाजानुसार, महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगणा आणि पूर्व राजस्थान या राज्यांतही हिवाळ्याचा प्रभाव सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे. किमान तापमानात सातत्याने घट होईल आणि काही भागांत शून्याजवळ तापमान जाण्याचीही शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट सरासरीपेक्षा अधिक दिवस टिकेल, तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही तापमानातील घट प्रकर्षाने जाणवेल.

डिसेंबर महिन्यात उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका अधिक राहण्याचे संकेत आहेत. दरम्यान, पावसाची शक्यता मात्र विविध भागांत भिन्न आहे. पूर्व किनारपट्टी, गुजरात, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या उत्तरेकडील भागात डिसेंबर महिन्यात पावसाची शक्यता सरासरीइतकी किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. यामुळे तापमानातील चढउतार अधिक जाणवतील.

थंडीच्या लाटांचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांनीही सतर्क राहण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात रब्बी हंगामातील पिके थंडीच्या फटक्यामुळे बाधित होऊ शकतात. त्यामुळे कृषी विभागाने लवकरच मार्गदर्शक सूचना जारी करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Anganewadi Jatra 2026 : भाविकांसाठी आनंदाची बातमी, मालवणच्या भराडी देवीचा यात्रेला कौल

दुसरीकडे, शहरांमध्येही तापमानातील अचानक घट आरोग्यविषयक समस्या निर्माण करू शकते. नागरी भागांमध्ये कोरडे वातावरण, धुरकट हवा आणि रात्रीचे वाढते प्रदूषण याचा परिणाम नागरिकांच्या श्वसनसंस्थेवर होऊ शकतो. त्यामुळे मास्कचा वापर, गरम पेयांचे सेवन, योग्य कपड्यांचा वापर आणि पुरेशी झोप घेणे याबाबत आरोग्य खात्याने विशेष सूचना दिल्या आहेत.

हिवाळ्याचा हा वाढलेला कडाका तीन महिने कायम राहण्याची शक्यता असल्याने राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाकडूनही आवश्यक तयारी सुरू करण्यात आली आहे. थंडीच्या लाटांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधा, आश्रय केंद्रे, आणि आपत्कालीन सेवांवर लक्ष केंद्रीत करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत.

यंदाचा हिवाळा सामान्यपेक्षा अधिक लांब आणि अधिक तीव्र असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांवर लक्ष ठेवून सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number