‘ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट’ अशी ओळख असलेल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपली प्रतिमा हळूहळू गमवताना दिसत आहे. प्रशासनाची चाललेली अव्यवस्था हे त्यातीलच एक कारण आहे. मागील वर्षभरात विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या समोर आल्या.
त्यावर तोडगा काढण्यासाठी अभाविप ने वारंवार विद्यापीठातील संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली, निवेदने दिली, वेळ आल्यावर आंदोलने ही केली. पण, या सर्वातून एक बाब ठळक होते ती म्हणजे विद्यापीठाची दूर्व्यवस्था. विद्यार्थ्यांना उच्च व चांगल्या दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी परिसरात आनंदमय व सकारात्मक वातावरण असायला हवे. पण दरदिवशी एक नवीन समस्या विद्यार्थ्यांच्या समोर उभी राहिल्यास त्यांच्या शिक्षणावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. या सर्व बाबींचा विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने विचार करून यावर मार्ग काढावा. विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळवून देण्याकरिता वेशीला टांगलेल्या विषयांवर उजाळा देण्यासाठी अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांना खुले पत्र लिहिले आहे. हे वाचल्यावर नक्कीच कुलगुरू याचा सकारात्मकतेने विचार करतील व विद्यापीठाचे प्रलंबित प्रश्न सोडवतील असा विश्वास अनिल ठोंबरे यांनी व्यक्त केला.