‘पाकिस्तान भारताला हरवणार’ IITian बाबाचं भाकीत

कुंभमेळ्यातील बहुचर्चित IITian बाबाने भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धचा सामना हरणार असं इंस्टाग्रामवरून सांगितलं आहे.

‘पाकिस्तान भारताला हरवणार’ IITian बाबाचं भाकीत

मुंबई: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून  सुरु झाली आहे. भारताचा पहिला सामना बांगलादेश विरुद्ध झाला. भारताने हा सामना सहा गडी राखून जिंकला. भारताचा दुसरा सामना यजमान संघ पाकिस्तानसोबत आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याकडे सर्वांचंच लक्ष असतं. क्रिकेट तज्ज्ञांपासून क्रिकेट रसिकांपर्यंत  कोणी आपलं मत मांडायला लाजत नाही. जर आपण इतिहासात डोकावून पाहिलं तर भारताचं पारडं नेहमीच जड राहिलेलं आहे. भारत क्वचितच पाकिस्तान विरुद्धचा सामना आयसीसी स्पर्धांमध्ये हरला आहे. 

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना 23 फेब्रुवारीला होणार आहे. याच सामन्यावर IITian बाबाने भाकीत केलं आहे की 'भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धचा  सामना हरणार आहे. विराट कोहली आणि बाकीच्या खेळाडूंनी कितीही जोर लावला तरी भारताला हा सामना जिंकवू शकणार नाहीत. मी जर नाही बोललो म्हणजे हा सामना भारत जिकणार नाही. आता बघू देव मोठा आहे की खेळाडू'' 
 
IITian बाबाच्या या विधानानंतर त्याला सामाजिक माध्यमावर भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांनी ट्रॉल केलं आहे. अनेक लोकांचं म्हणणं आहे की हा व्हिडिओ सेवा करून ठेवणार आणि भारत जिंकल्यावर हा व्हिडिओ IITian बाबाला दाखवणार. 

भारत जर पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकला तर भारताची उपांत्य फेरीतील जागा जवळपास निश्चित होईल. भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. पाकिस्तान त्यांचा पहिला सामना हरला आहे. जर भारताविरुद्धचा सामना पाकिस्तान हरला तर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधून बाहेर पडणे निश्चित आहे 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number