आमच्या भूमीवर जर कोणी दहशतवाद केला तर ते कदापी खपवून घेणार नाही; उज्ज्वल निकम आक्रमक

वरिष्ठ सरकारी वकील आणि दहशतवादविरोधी खटल्यांचे प्रमुख नेते उज्ज्वल निकम यांनी भारतीय लष्कर आणि मोदी सरकारचे मनापासून आभार मानले. त्यासोबतच, उज्ज्वल निकम म्हणाले.

आमच्या भूमीवर जर कोणी दहशतवाद केला तर ते कदापी खपवून घेणार नाही; उज्ज्वल निकम आक्रमक

मुंबई: 22 एप्रिल रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकड्यांविरोधात टोकाची भूमिका घेत 6 मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्यातील काश्मीर येथे मध्यरात्री एअर स्ट्राईक करत 'सिंदूर ऑपरेशन' मध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर आक्रमण करून दहशतवाद्यांचा खात्मा केला. हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकचे जगभरासह देशात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आहे.

देशातील सर्वसामान्य जनतेपासून ते दिग्गज लोकांपर्यंत अनेकांनी हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकचे कौतुक केले आहे. अशातच, वरिष्ठ सरकारी वकील आणि दहशतवादविरोधी खटल्यांचे प्रमुख नेते उज्ज्वल निकम यांनी भारतीय लष्कर आणि मोदी सरकारचे मनापासून आभार मानले. त्यासोबतच, उज्ज्वल निकम म्हणालेवरिष्ठ सरकारी वकील आणि दहशतवादविरोधी खटल्यांचे प्रमुख नेते उज्ज्वल निकम यांनी भारतीय लष्कर आणि मोदी सरकारचे मनापासून आभार मानले. त्यासोबतच, उज्ज्वल निकम म्हणाले की, 'भारताची भूमी शांततेसाठी ओळखली जाते, परंतु जर कोणी आपल्या भूमीवर दहशतवाद करण्याचा प्रयत्न केला तर ते कधीही सहन केले जाणार नाही'.

हेही वाचा: भारताच्या एअर स्ट्राईक हल्ल्यावर संजय राऊत चिडिचूप; राहुल गांधींना सुद्धा करावं लागलं हवाई हल्ल्याचं कौतुक

पुढे निकम म्हणाले की, 'या हल्ल्याने भारताने संपूर्ण जगाला दाखवून दिले की, भारत केवळ प्रतिक्रिया देणारे नसून आक्रमण करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सक्षम आहे. ही कारवाई नियोजित, मर्यादित आणि अत्यंत प्रभावी होती. याला सैन्याचे विजय म्हणणे कमी लेखण्यासारखे ठरेल. हा राष्ट्रीय अभिमानाचा क्षण आहे'. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलाने दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांसाठी वापरल्या जाणाऱ्या लक्ष्यित ठिकाणांना अत्यंत अचूकतेने उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईमुळे फक्त पाकिस्तानलाच नाही, तर दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या इतर देशांनाही स्पष्ट इशारा दिला आहे.

उज्ज्वल निकम यांनी या घटनेचा गौरव करत म्हणाले की, 'हा हल्ला केवळ सूड उगवण्याचा प्रयत्न नसून तो प्रबळ राजकीय इच्छाशक्ती आणि कार्यक्षम लष्करी रणनीतीचे मिश्रण आहे. मोदी सरकारने घेतलेला निर्णय आणि लष्कराची धाडसी कामगिरी आपल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे'.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number