Bacchu Kadu : "मंत्री चुकला तर ठोकल्याशिवाय राहू नका…" बच्चू कडू यांचा शिवसैनिकांना सल्ला

आज शिवसेना शिंदे गटाचा गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे मेळावा पार पडला. या मेळाव्यात बच्चू कडू यांनी शिवसैनिकांना थेट आवाहन केले आहे.

Bacchu Kadu : &quotमंत्री चुकला तर ठोकल्याशिवाय राहू नका…&quot बच्चू कडू यांचा शिवसैनिकांना सल्ला

आज शिवसेना शिंदे गटाचा गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे मेळावा पार पडला. या मेळाव्याला राज्याचे मंत्री भरत गोगावले, मंत्री आशिष जयस्वाल तसेच शिवसेना नेते व आमदार बच्चू कडू उपस्थित होते. या कार्यकर्ता मेळाव्यात बच्चू कडू यांनी भाषण करताना कार्यकर्त्यांना ‘आपला मंत्री जरी असेल आणि चुकत असेल तर त्याला ठोकून काढा असं सल्ला दिला आहे. तसेच अनेक पक्षामध्ये जाण्याच्या वाटा मोकळ्या होत्या. मात्र, मी एकनाथ शिंदेंकडे जाण्याचा पर्याय निवडला कारण ते एकमेव मर्द आहेत’, असं देखील बच्चू कडू म्हणाले आहेत.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घुसफूस आणि अंतर्गत वाद पाहायला मिळत आहेत. अशातच गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे पार पडलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्तांच्या मेळाव्यात बच्चू कडू यांनी आगामी राजकीय घडामोडी, संघटनात्मक बांधणी इतर मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. तसेच नवनीत राणा राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर जाण्यासाठी चाचणनी करत आहेत यावर बच्चू कडू यांनी बोलणं टाळलं.

यावेळी बच्चू कडू म्हणाले की, “माझ्यासमोर अनेक पक्षांमध्ये जाण्याच्या वाटा मोकळ्या होत्या. आमचा स्वतंत्र पक्ष होता, अनेक पक्षांमध्ये जाऊन आम्हाला आमचं स्थान निर्माण करता आलं असतं. पण आम्हाला एकनाथ शिंदे खऱ्या अर्थाने मर्द वाटले. त्यांच्याशिवाय दुसरा मर्द नाही त्यामुळे आम्ही शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे रात्री दोन वाजता मदतीसाठी हजर असतात. मुख्यमंत्री असतानाही रात्री अडीच वाजता शेतकऱ्यांना भेटणं ही एकनाथ शिंदे यांची खरी ओळख आहे.

हेही वाचा- NCP Sunil Tatkare On Navneet Rana : “नवनीत राणा हा विषय…” नवनीत राणांच्या राष्ट्रवादीतील राज्यसभा उमेदवारीवर तटकरेंची थेट प्रतिक्रिया

हीच ओळख आम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याला न्यायची आहे. भाजपने मित्र पक्षासारखं वागावं… त्यांनी असं समजू नये की, आमचं कोणी वाली नाही आहे. आमच्या जिल्हाप्रमुखांना भाजपने त्रास देण्याचे काम थांबवायला पाहिजे नाही थांबल तर आम्ही त्यात माहिर आहोत. एक सेवाभावी माणूस आम्ही पाहत आहोत. शेवटच्या टोकापर्यंत त्याचा आवाज, त्याचा संवाद, त्याची प्रामाणिकता, त्याचे व्यक्तिमत्व नेण्याचे काम आम्हाला करावं लागणार आहे. मित्रांनो तुम्ही-आम्ही सत्तेत आहोत म्हणून सुस्त राहता कामा नये. सत्तेत आहोत म्हणून काही करताच येत नाही असं जर वाटत असेल तर मंत्री जरी आपला असला तरी चुकत असेल तर ठोकल्याशिवाय राहू नका.”

तसेच गोंदिया जिल्ह्याच्या देवरी येथे सुफलाम इथेनॉल कंपनी बनविण्यात आली आहे. या इथेनॉल कंपनीला शिरपूर धरणाचे शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी दिले जात आहे. तो पाणी देणे बंद झालं नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 1 जुलै रोजी आंदोलन करणार असल्याचे इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची जर निपटारा झाला नाही तर ह्या आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे ते गोंदियाच्या देवरी येथे माध्यमांशी बोलत होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number