ICC Team of Tournament 2026 : आयसीसीकडून ‘टीम ऑफ टुर्नामेंट’ची घोषणा, सर्वोत्तम प्लेईंग 11 मध्ये भारताच्या फक्त ‘या’ चार खेळाडूंना स्थान

नुकताच टी20 विश्वचषक 2026 स्पर्धेचा अंतिम सामन्यात भारताने विजय मिळवला. यानंतर आता आयसीसीने स्पर्धेदरम्यान चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सर्वोत्तम आयसीसी संघात समावेश केला आहे.

ICC Team of Tournament 2026 : आयसीसीकडून ‘टीम ऑफ टुर्नामेंट’ची घोषणा, सर्वोत्तम प्लेईंग 11 मध्ये भारताच्या फक्त ‘या’ चार खेळाडूंना स्थान

नुकताच टी20 विश्वचषक 2026 स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. यादरम्यान टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कप 2026 च्या फायनलमध्ये न्यूझीलंडवर मात करत पुन्हा एकदा विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. यानंतर आता आयसीसीने स्पर्धेदरम्यान चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सर्वोत्तम आयसीसी संघात समावेश केला आहे. दरम्यान वर्ल्ड कप टी-20 स्पर्धेतील आयसीसीच्या सर्वोत्तम संघात भारतातील अवघ्या चार खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला वगळता भारताकडून संजू सॅमसन, ईशान किशन, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह या भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश आहे. तसेच एडन मार्करॅम संघाचा कर्णधार असणार असल्याचे आयसीसीने जाहीर केले. यावेळी पाकिस्तानचा केवळ एक खेळाडू या संघात समाविष्ट आहे. 

संजू सॅमसनचे सर्वाधिक षटकार
सुरुवातीला प्लेइंग इलेव्हनबाहेर असलेल्या संजूने अंतिम सामन्यात षटकारांचा पाऊस पाडला. शेवटच्या 3 सामन्यांत त्याने सलग 80 पेक्षा जास्त धावांची खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. संजू सॅमसनने या स्पर्धेत एकूण 321 धावा फटकावल्या. त्याने सर्वाधिक 24 षटकार ठोकले, तर न्यूझीलंडचा फिन ॲलन 20 षटकारांसह दुसऱ्या स्थानी राहिला. क्षेत्ररक्षणात ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 11 झेल घेत आपली छाप पाडली. संजूला त्याच्या या झंझावाती कामगिरीसाठी 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' (मालिकावीर) पुरस्काराने गौरवण्यात आले. अंतिम टप्प्यात संजू सॅमसन आणि जसप्रीत बुमराह यांची कामगिरी निर्णायक ठरली.

अंतिम सामन्यात बुमराहची जादू
न्यूझीलंडविरुद्धच्या हाय-व्होल्टेज अंतिम सामन्यात जसप्रीत बुमराह भारताचा तारणहार ठरला. त्याने आपल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर केवळ 15 धावा देऊन 4 बळी टिपले. 5 बळी घेण्याची संधी थोडक्यात हुकली असली, तरी त्याच्या या स्पेलमुळे न्यूझीलंडचे कंबरडे मोडले आणि त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच' (सामनावीर) घोषित करण्यात आले. बुमराहने संपूर्ण स्पर्धेत एकूण 14 बळी घेतले आहेत.

Kirti Azad on Team India : 'लाज वाटली पाहिजे!' माजी क्रिकेटपटूचा विश्वचषक विजेत्या भारतीय संघावर निशाणा, सोशल मिडियावर पोस्ट करत सांगितलं सारं काही

ऑलराउंडर पांड्याची निर्णायक कामगिरी
टी20 वर्ल्ड कप 2026 च्या संपूर्ण स्पर्धेत हार्दिक पांड्या त्याच्या ऑलराउंडर क्षमतेमुळे चांगल्या फॉर्ममध्ये राहिला. फलंदाजी किंवा गोलंदाजी हार्दिकचा वाटा महत्त्वाचा ठरला आहे. हार्दिकच्या फलंदाजीबद्दल बोलायच झाले तर त्याने टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत 217 धावा केल्या आहेतद, तसेच 9 विकेट घेतल्या. गोलंदाजीबद्दल बोलायच झालं तर पाकिस्तानविरुद्ध सामन्यात हार्दिकने पाकिस्तानकडून भारतासाठी सर्वात मोठा धोका असलेल्या फरहानला शून्यावर बाद केले आणि नंतर उस्मान तारिकला बाद करून पाकिस्तानचा डाव संपवला. टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातही त्याने त्याचा फॉर्म कायम ठेवला. 

इशान किशनची प्रभावी खेळी
इशान किशनने टी20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत 9 सामने खेळले असून 317 धावा केल्या. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या इशान किशनने टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये मैदानात आपल्या फलंदाजीची जादू पसरवली. किशनने अंतिम सामन्यात 54 धावा दिल्या आणि दोन महत्त्वाचे झेल घेतले. इशान किशनने वरच्या क्रमांकावर अविरत आक्रमक खेळी करत प्रभाव पाडला.

हेही वाचा- T20 World Cup : T20 WC 2028 ची तारीख ठरली! पाहा कधी आणि कुठे खेळला जाईल पुढील विश्वचषक; ठिकाण आणि संघही जाहीर

फायनलमध्ये सूर्याची निराशाजनक कामगिरी 
सूर्यकुमार यादवने टी20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेत 9 सामन्यांमध्ये एकूण 242 धावा केल्या. सूर्यकुमार यादवचा शेवटचा सामना फलंदाज म्हणून निराशाजनक होता. तो धावा न करता बाद झाला. सूर्या टीम इंडियासाठी या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला.

आयसीसी टी20 वर्ल्ड कप संघ-
साहिबझादा फरहान (पाकिस्तान), संजू सॅमसन (भारत, यष्टिरक्षक), ईशान किशन (भारत), एडन मार्करम, (दक्षिण आफ्रिका, कर्णधार), हार्दिक पंड्या (भारत), विल जॅक्स (इंग्लंड), जेसन होल्डर (वेस्ट इंडिज), जसप्रीत बुमराह (भारत), ल्युंगी एन्गिडी (दक्षिण आफ्रिका), आदिल रशीद (इंग्लंड), ब्लेसिंग मुझरबानी (झिम्बाब्वे). बारावा खेळाडू – शेंडली व्हॅन शाल्विक (अमेरिका).

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number