माझ्या संपत्तीवर फक्त माझ्या मुलाचाच नाही तर माझ्या मुलीचाही हक्क असणार असल्याचे बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे. एका रिअॅलिटी शोमध्ये बोलत असताना हा खुलासा केल्याचे स्पष्ट झाले आहे. बिग बींच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर त्यांची चांगली चर्चा सुरू आहे.
एका रिअॅलिटी शोमध्ये बोलताना अमिताभ बच्चन यांनी आपल्या परिवारासंदर्भात मोठा खुलासा केला आहे.
माझ्या संपत्तीत माझ्या मुलासह मुलीचाही त्याप्रमाणे वाटा असल्याचे अमिताभ बच्चन यांनी सांगितले आहे.
मुलांप्रमाणेच मुलींचाही वडिलोपर्जित मालमत्तेत समान हक्क असल्याचे अमिताभ बच्चन यांनी सांगितले आहे.
माझ्या संपत्तीत केवळ अभिषेकला नाही तर श्वेतालाही समान वाटा दिला जाणार असल्याचे अमिताभ बच्चन यांनी स्पष्ट केले आहे.
एक हिस्सा अभिषेकचा असेल तर दुसरा मुलगी श्वेता नंदाचा असेल असे अमिताभ यांनी म्हटलं आहे.