विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष सज्ज झाले असून मतदारांशी संवाद साधण्यासाठी यात्रा काढत आहेत.युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे अनेक दिवसांपासून जन आर्शिवाद यात्रेवर आहेत. अनेक जिल्ह्यात जाऊन मतदारांशी संवाद साधत असून जनतेच्या आर्शिवादासाठी निघालो असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. अमरावतीमध्ये दाखल झालेल्या जन आर्शिवाद यात्रेवेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे ?
जनतेच्या आर्शिवादासाठी मी निघालो असून मी पुढे नवा महाराष्ट्र घडविणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
गेल्या अनेक दिवसांपासून मतदारांशी संवाद साधण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जन आर्शिवाद यात्रेचे आयोजन केले आहे.
सध्या ही यात्रा अमरावतीमध्ये दाखल झाली असून यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे यांची जन आर्शिवाद यात्रा अमरावतीत दाखल झाल्यानंतर अमरावतीकरांनी त्यांचे जंगी स्वागत केले.
सेवा देणारी शिवसेना आहे आणि शिवसेनेने दिलेली वचनपूर्ती मी करणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
निवडणूक झाल्यावर लोकं आभार मानतात . मात्र निवडणूक होण्यापूर्वी लोकांचे आभार मानत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.