‘मी सगळ्यांच्या पाठिंब्यावरच निवडणूक लढत आहे’, असे सांकेतिक वक्तव्य नाशिक पदवीधर मतदारसंघातून उभे राहिलेले अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्याकडून नाशिक येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे.
‘टीडीएफ, शिक्षक भारती, कनिष्ठ महाविद्यालय महासंघाने मला पाठिंबा दिला आहे, माझी उमेदवारी अपक्ष असल्यामुळे सर्व संघटना माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत’, असे सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेस नेते सुधीर तांबे यांनी ऐनवेळी माघार घेतली होती आणि त्याजागी त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला होता.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.