‘मी अजित पवारांना ओळखत नाही’ – नारायण  राणे

शिवसैनिकावरील हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्यावरील अटेकवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. अजित पवारांनी सिंधुदुर्गमध्ये केलेल्या वक्त्यव्यावर नारायण राणे म्हणाले, मी अजित पवारांना ओळखत नाही, कोण आहेत अजित पवार, तसेच आदित्य ठाकरे आणि मांजरीचा काय संबंध? […]

‘मी अजित पवारांना ओळखत नाही’ – नारायण  राणे

शिवसैनिकावरील हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्यावरील अटेकवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

अजित पवारांनी सिंधुदुर्गमध्ये केलेल्या वक्त्यव्यावर नारायण राणे म्हणाले, मी अजित पवारांना ओळखत नाही, कोण आहेत अजित पवार, तसेच आदित्य ठाकरे आणि मांजरीचा काय संबंध? असा सवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.

कोण आहेत अजित पवार, मी त्यांना ओळखत नाही, असे म्हणत नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. कोकणात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती, वादळ कोसळलं होते तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार कुठे होते, असा सवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे विधानसभेच्या पायऱ्यांवरून जाताना भाजप आमदार नितेश राणे यांनी म्याऊ-म्याऊ करत त्यांना डिवचलं होतं. याप्रकरणी नारायण राणे यांनी नितेश राणे यांना अप्रत्यक्ष समर्थन केले. आदित्य ठाकरे आणि मांजरीचा काय संबंध आहे, तसेच मांजरीचा आवाज काढला म्हणून राग का आला? असा सवालही त्यांनी केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number