Husain Dalwai: ‘हिंदूही दहशदवादी असू शकतो’; दहशदवादाविरोधात हुसेन दलवाईं यांचे खळबळजनक वक्तव्य, बागेश्वर बाबांचाही घेतला समाचार

याचबरोबर त्यांनी देशाच्या धर्मनिरपेक्षतेवर भर देत, “भारत हा महात्मा गांधींच्या विचारांवर चालणारा देश आहे. येथे सर्व धर्मांना समान स्थान आहे,” असे स्पष्ट केले.

Husain Dalwai: ‘हिंदूही दहशदवादी असू शकतो’; दहशदवादाविरोधात हुसेन दलवाईं यांचे खळबळजनक वक्तव्य, बागेश्वर बाबांचाही घेतला समाचार

नवी दिल्ली: नागपूरमध्ये बागेश्वर बाबा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर निर्माण झालेला वाद शांत होण्याआधीच आता नव्या विधानांमुळे पुन्हा पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांवरून आणि “हिंदूंनी अधिक मुलं जन्माला घालावीत” या विधानावरून राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर बागेश्वर बाबांनी माफी मागून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी या मुद्द्यावर भाष्य करत नवीन वादाला तोंड फोडले आहे. “बागेश्वर धाम यांनी स्वतः लग्न करून चार नव्हे तर दहा मुलं जन्माला घालावीत,” असा टोला त्यांनी लगावला. देशात वाढती महागाई, शिक्षण आणि आरोग्याच्या मर्यादित सुविधा लक्षात घेता जास्त मुलं जन्माला घालण्याचे आवाहन चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले.

दलवाई यांनी पुढे सांगितले की, आज मुस्लिम समाजातही कुटुंब नियोजनाबाबत जागरूकता वाढली आहे. “कुटुंब लहान असेल तरच त्यांना योग्य सुविधा देता येतात,” असे ते म्हणाले. त्यामुळे लोकसंख्यावाढीला प्रोत्साहन देणारी वक्तव्ये समाजासाठी घातक असल्याचा त्यांचा दावा आहे.

हेही वाचा: Raghav Chadha: ‘पक्षावर भ्रष्ट लोकांचं नियंत्रण’; राघव चड्ढांनी उघड केली ‘आप’मधील ‘टॉक्सिक’ संस्कृती, भाजपमधील प्रवेशानंतर पहिली प्रतिक्रिया समोर

याचबरोबर त्यांनी देशाच्या धर्मनिरपेक्षतेवर भर देत, “भारत हा महात्मा गांधींच्या विचारांवर चालणारा देश आहे. येथे सर्व धर्मांना समान स्थान आहे,” असे स्पष्ट केले. दहशतवादाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी “दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, इतर धर्मांप्रमाणे हिंदूही दहशदवादी असू शकतो त्यामुळे त्याकडे एका दृष्टिकोनातूनच पाहिले पाहिजे,” असे मत दलवाई यांनी मांडले आहे.

दलवाईंच्या या वक्तव्यामुळे आधीच तापलेल्या वातावरणात आणखी भर पडली आहे. बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावरून सुरू झालेला हा वाद आता नव्या राजकीय रंगात रंगताना दिसत आहे. आगामी काळात या मुद्द्यावर आणखी कोणत्या प्रतिक्रिया उमटतात आणि हा वाद किती तीव्र होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा: Pune MHADA Lottery: पुणेकरांसाठी गृहस्वप्नपूर्तीची सुवर्णसंधी; ताथवडे येथील 792 म्हाडा घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number