वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात नवरा, सासू आणि नणंदेला अटकेत

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात नवरा, सासू आणि नणंद यांना अटक करण्यात आले आहे.

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात नवरा, सासू आणि नणंदेला अटकेत

पिंपरी चिंचवड: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात नवरा, सासू आणि नणंद यांना अटक करण्यात आले आहे. मृत वैष्णवी हगवणे हिच्या वडिलांनी नवरा, सासू, सासरा, दीर आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात नवरा, सासू आणि नणंद या तिघांना 26 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

वैष्णवीचा हुंडाबळी प्रकरणात मृत्यू झाल्याने नवरा शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना अटक करण्यात आली आहे.तसेच 26 मे पर्यंत तिघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वैष्णवीने बेडरुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे. मात्र मृत्यूपूर्वी तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा दिसून आल्या. या प्रकरणात सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर फरार असून पोलिसांकडून त्यांचा तपास सुरु आहे. राजेंद्र हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षातील मुळशी तालुकाध्यक्ष असल्याने सर्वत्र प्रकरणाची चर्चा होत आहे. राजकीय मंडळी या प्रकरणावर भाष्य करत आहेत. वैष्णवीच्या आरोपींना शिक्षा मिळाली पाहिजे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. 

हेही वाचा : राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजेंद्र हगवणेंचा पोलिसांकडून शोध सुरु; हुंड्यासाठी सूनेचा बळी घेतल्याचा आरोप

वैष्णवी हगवणे प्रकरण काय?
वैष्णवी हगवणे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुळशी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणेंची सून आहे. 16 मे रोजी बेडरुममध्ये गळफास घेऊन तिने आत्महत्या केली असून मृत्यूपूर्वी वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या जखमा दिसून आल्या आहेत. हुंड्यासाठी वैष्णवीची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणात सासरा,सासू, नवरा, दीर आणि नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवरा, सासू आणि नणंदेला पोलिसांनी अटक केली आणि सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर अद्यापही फरार आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे. 27 नोव्हेंबर 2023 मध्येही विष पिऊन वैष्णवीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. लग्नात वैष्णवीच्या घरच्यांकडून 51 तोळे सोने, फॉर्च्युनर कार आणि चांदीची भांडी घेण्यात आली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number