UIDAI e-Aadhar Card: आजच्या काळात आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयासाठी ‘सर्वात बेसिक आणि सर्वात महत्वाचे ’ कागदपत्र बनले आहे. PAN लिंकिंग असो, बँक खाते उघडणे असो, सिम कार्ड विकत घेणे असो, रेशन योजनांचा लाभ असो किंवा मुलांच्या शिक्षणाशी संबंधित प्रक्रिया जवळजवळ प्रत्येक अधिकृत कागदपत्रात आधारची गरज पडतेच. पण समस्या अशी की काही वेळा आधार कार्ड हरवून जाते, जुने पाकीट सापडत नाही, किंवा डिजिटल फाइलही जपली जात नाही. शिवाय अनेक जणांना आधारचा 12 अंकी नंबरही आठवत नाही. अशावेळी पुढे काय? कार्ड नंबरही आठवत नाही, मग ई-आधार डाउनलोड कसा करणार?
बर्याच लोकांना वाटतं की आधार नंबर शिवाय काहीही शक्य नाही. पण UIDAI ने नागरिकांना यासाठी सोयीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही तुमच्या माहितीच्या मदतीने तुमची UID किंवा EID पुन्हा retrieve करू शकता आणि त्यानंतर ई-आधार डाउनलोड करता येतो.
आधार नंबर आठवत नाही? तरीही शक्य
सर्वप्रथम UIDAI च्या वेबसाइटवर जा
“My Aadhaar” मध्ये “Retrieve Lost / Forgotten UID/EID” हा पर्याय सिलेक्ट करा
आता नाव, जन्मतारीख आणि रजिस्टर मोबाईल नंबर किंवा ईमेल टाका
स्क्रीनवर दाखवलेला CAPTCHA भरून “Send OTP” वर क्लिक करा
मोबाइल किंवा ईमेलवर आलेला OTP टाका
OTP verify केल्यानंतर तुमची UID/EID स्क्रीनवर मिळते
त्यानंतर तुम्ही ई-आधार डाउनलोड करू शकता
ही संपूर्ण प्रक्रिया मोफत आहे. म्हणजे कोणताही शुल्क नाही.
मोबाइल नंबर लिंक नाही? तरीही उपाय आहे
काही जणांचे जुने आधार घेताना नंबर लिंक नव्हता, किंवा आज नंबर बदलले आहेत. अशावेळी ऑनलाईन OTP verify शक्य होत नाही. मग काय?
त्यासाठी जवळच्या आधार एनरोलमेंट सेंटरला भेट देणे आवश्यक आहे. तिथे 28 आकडी EID (जी आधार घेताना slip वर दिली होती) दाखवावी लागते. त्यानंतर बायोमेट्रिक verify केल्यानंतर ई-आधार प्राप्त करता येतो. या सेवेसाठी साधारण 30 रुपये शुल्क आकारले जाते.
PVC आधार कार्डही घरी मागवता येते
UIDAI आता PVC आधार कार्ड घरपोच पाठवते. ATM कार्डसारखा दिसणारा हा कार्ड वॉलेटमध्ये ठेवायला सोपा आणि टिकाऊ असतो.
ही ऑर्डरही ऑनलाइन करता येते:
आधार नंबर भरा
OTP verify करा
“Order PVC Aadhaar Card” सिलेक्ट करा
50 रुपये ऑनलाइन पेमेंट
यानंतर UIDAI कार्ड प्रिंट करून 5 दिवसात डाक विभागाकडे देते आणि स्पीड पोस्ट ने कार्ड घरी पोहोचते.
आधार कार्ड हरवले तरी काळजी नको. नंबर आठवत नसला तरीही UIDAI ने पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. घरबसल्या काही मिनिटांत ई-आधार पुन्हा डाउनलोड करता येतो.