Dharmendra ‘He-Man’ : मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या धर्मेंद्र यांना ‘ही-मॅन’ नाव कसं पडलं? ‘तो’ सिन ठरला त्यांच्या स्टारडमचा टर्निंग पॉईंट

बॉलिवूडमधील ‘ही-मॅन’ म्हणून ओळखला जाणारा ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांनी भारतातच नव्हे तर जगभरातील त्यांच्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. पण त्यांना हे नाव कसं पडलं जाणून घ्या...

Dharmendra ‘He-Man’ : मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या धर्मेंद्र यांना ‘ही-मॅन’ नाव कसं पडलं? ‘तो’ सिन ठरला त्यांच्या स्टारडमचा टर्निंग पॉईंट

बॉलिवूडमधील ‘ही-मॅन’ म्हणून ओळखला जाणारा ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांनी भारतातच नव्हे तर जगभरातील त्यांच्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले. धर्मेंद्र यांचे पार्थिव आज दुपारी विलेपार्ले येथील स्मशानभूमीवर अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले असून या सोहळ्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांसह अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, आमिर खान यांसारखे अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. 

त्यांनी बॉलिवूडमधील सहा दशकांहून अधिक काळ काम केले आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांना त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. २०१२ मध्ये त्यांना भारत सरकारचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी अनेक फिल्मफेअर पुरस्कार देखील जिंकले. त्यांना अनेक समीक्षक आणि प्रेक्षकांकडून प्रशंसा देखील मिळाली आहे. त्यांच्या योगदानामुळे ते बॉलिवूडमधील महान आणि आदरणीय अभिनेत्यांपैकी एक बनले आहेत. 

हेही पाहा- Bollywood Actors On Dharmendra : बॉलिवूडचा ही-मॅन काळाच्या पडद्याआड! कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

यावेळी त्यांना अनेक दिग्गज कलाकारांनी, राजकीय नेत्यांनी, खेळाडूंनी तसेच सिनेसृष्टीतील दिग्दर्शकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. दरम्यान यामध्ये  भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक करण जोहर यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टवरमुळे धर्मेंद्र यांच्याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. करण जोहरने केलेल्या पोस्टमध्ये लिहल आहे की, "हा एका युगाचा अंत आहे… एक उत्तुंग मेगास्टार… मुख्य प्रवाहातील चित्रपटसृष्टीतील एका नायकाचे मूर्त स्वरूप… अविश्वसनीयपणे देखणा. धर्मेंद्रला बॉलिवूडचा 'ही-मॅन' म्हटले जाते. त्यांना हे नाव विनाकारण मिळाले नाही. त्यामागे एक कारण होते."

हेही वाचा- politicians On Dharmendra : बॉलिवूडच्या ‘ही-मॅन’ला 89 व्या वर्षी निरोप! राजकीयवर्तूळातून भावपूर्ण श्रद्धांजली

1966 साली प्रदर्शित झालेला ओ.पी. रल्हान यांचा 'फूल और पत्थर' हा अ‍ॅक्शन चित्रपट प्रचंड हिट ठरला. या चित्रपटात धर्मेंद्र यांनी एक भूमिका साकारली होती. ज्यात त्यांनी त्यांचा शर्ट काढला. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेमुळे धर्मेंद्रचे आयुष्य बदलून टाकले. या चित्रपटानंतर त्यांना महिलांचा मोठा चाहता वर्ग मिळाला. त्यांच्या शर्टलेस प्रतिमांनी त्यांना अ‍ॅक्शन हिरो म्हणून लोकप्रियतेच्या नवीन शिखरावर पोहचवले. त्यांच्या बळकट शरीरयष्टीने त्यांची ही-मॅन म्हणून प्रतिमा आकारली. त्यानंतर हिंदी चित्रपट उद्योग आणि माध्यमांनी त्यांना हे नाव दिले. धर्मेंद्र यांच्याशी संबंधित बातम्यांमध्ये हे नाव लवकरच वापरले जाऊ लागले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number