आशिष शेलारांच्या आरोपावर गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

अंगडिया व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांना निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय यंत्रणांच्या नावाने राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत वसुलीचे षडयंत्र रचलं जात नाही का? अशी शंका शेलारांनी उपस्थित केली आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे. तर आशिष शेलार […]

आशिष शेलारांच्या आरोपावर गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

अंगडिया व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांना निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय यंत्रणांच्या नावाने राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत वसुलीचे षडयंत्र रचलं जात नाही का? अशी शंका शेलारांनी उपस्थित केली आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे. तर आशिष शेलार यांच्या आरोपावर गृहमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

आशिष शेलार यांनी सौरभ त्रिपाठी प्रकरणी विधानसभेत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. राज्यातील प्रशासकीय यंत्रणा केंद्रीय यंत्रणांच्या नावाचा वापर करून वसुली करत नाहीत ना? केंद्रीय यंत्रणांना बदनाम करण्याचे षडयंत्र तर राज्यात शिजत नाही ना? अन्य अधिकारी वसुली करत नाहीत ना? त्यांच्या पाठीशी कोण आहे? असे प्रश्न शेलारांनी उपस्थित केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. त्यावर उत्तर देत, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी निलंबित

अंगडिया व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांना निलंबित करण्यात आले आहे. सौरक्ष त्रिपाठी यांना निलंबित करण्याच्या राज्य गृह विभागाच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी केली आहे. सौरक्ष त्रिपाठी यांनी याप्रकरणी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला आहे. या जामीन अर्जात त्यांनी म्हटले आहे की, यापूर्वी एफआयआरमध्ये त्यांचे नाव नमूद करण्यात आले नव्हते. पोलीस ठाण्यात अंगडियाकडून पैसे वसूल केले जात असल्याची माहिती त्यांना नव्हती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number