हिंगणघाट जळीतकांड : नराधमाला शिक्षा कधी ?

हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी या पीडितेनी अखेरचा श्वास घेतला. कुटुंबियांनी काही वेळ अंत्यसंस्कार रोखून धरंल होतं. लेखी आश्वासन दिल्यानंतरच कुटुंबियांनी पीडितेवर अंत्यसंस्कार केले. परिवारातील एकाला सरकारी नोकरी, प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी आणि परिवाराला आर्थिक मदत अशा प्रमुख तीन मागण्या कुटुंबियांनी केल्या होत्या. या तीन […]

हिंगणघाट जळीतकांड :  नराधमाला  शिक्षा कधी ?

हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी या पीडितेनी अखेरचा श्वास घेतला. कुटुंबियांनी काही वेळ अंत्यसंस्कार रोखून धरंल होतं.

लेखी आश्वासन दिल्यानंतरच कुटुंबियांनी पीडितेवर अंत्यसंस्कार केले.

परिवारातील एकाला सरकारी नोकरी, प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी आणि परिवाराला आर्थिक मदत अशा प्रमुख तीन मागण्या कुटुंबियांनी केल्या होत्या.

या तीन मागण्यांसाठी निवासी अधिकाऱ्यांकडून लिहून घेण्यात आलं. यानंतरच कुटुंबियांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

दरम्यान आता अंत्यसंस्कारानंतर नराधम आरोपीला शिक्षा कधी होणार, असा सवाल विचारला जात आहे.

या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मृत्यूनंतरच्या १२ तासांनी हा गुन्हा दाखल केला गेला.

तीव्र प्रतिक्रिया

ज्या वेदना पीडितेला झाल्या तशाच वेदना या नराधमाला झाल्या पाहिजेत, अशा प्रतिक्रिया पीडितेच्या गावकऱ्यांनी दिल्या. तर काही वेळ त्या विकृताला आमच्या हाती सोपवावे, आम्ही त्याला शिक्षा देऊ, अशाही प्रतिक्रिया संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी दिल्या.

दरम्यान या विकृत विकेश नगराळे विरुद्ध फास्ट ट्रक कोर्टात प्रकरण चालवण्यात येणार आहे.

यासाठी विशेष सरकारी वकिल उज्जवल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विकेश नगराळे या विकृताने 3 फेब्रुवारीला प्राध्यपिका तरुणीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर पीडितेला ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान या पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

हिंगणघाट येथील पीडिता अनंतात विलीन

हिंगणघाट जळीतकांड : विशेष सरकारी वकील म्हणून एड उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number