कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

कोल्हापूरात ०६ जून रोजी काही तरूणांनी आपल्या व्हॉट्सअपला औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे फोटो स्टेट्सला ठेवले होते. ज्यानंतर ही बाब काही हिंदुत्ववादी संघटनांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात करत या तरुणांवर कारवाई करण्याची विनंती केली. त्यानंतर या संघटनांनी दुपारी ०४ वाजेपर्यंत वाट पाहिली, पण या प्रकरणी कोणतीही कारवाई न करण्यात आल्याने हिंदुत्ववादी संघटनेच्या […]

कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

कोल्हापूरात ०६ जून रोजी काही तरूणांनी आपल्या व्हॉट्सअपला औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे फोटो स्टेट्सला ठेवले होते. ज्यानंतर ही बाब काही हिंदुत्ववादी संघटनांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात करत या तरुणांवर कारवाई करण्याची विनंती केली. त्यानंतर या संघटनांनी दुपारी ०४ वाजेपर्यंत वाट पाहिली, पण या प्रकरणी कोणतीही कारवाई न करण्यात आल्याने हिंदुत्ववादी संघटनेच्या तरूणांनी पोलीस स्टेशनच्या समोरच ठिय्या आंदोलन करण्यास सुरूवात केली.

त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तीन ते चार तरूणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. हे सर्व तरूण अल्पवयीन असल्याचे उघड झाले. ज्यानंतर कोल्हापुरातील वातावरण शांत झाले. पण या प्रकरणावरून पुन्हा एकदा रात्री हिंदुत्ववादी संघटनांमध्ये बैठक झाली. ज्यामध्ये महाराष्ट्रात या घटना पुन्हा घडू नये, यासाठी निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सकाळी ९:३० वाजल्यापासून कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत आंदोलन करण्यास सुरूवात केली.

 कोल्हापुरात होत असलेल्या आंदोलनामुळे सकाळपासूनच शहरातील सर्व बाजारपेठांमधील दुकाने बंद ठेवण्यात आलेली आहेत. सकाळी दहापासून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात गर्दी केली. आक्षेपार्ह स्टेटस ठेवून राष्ट्रपुरुषांच्या बदनामीचे मेसेज व्हायरल करणा-यांवर कडक कारवाईची मागणी केली. तसेच पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ४०० ते ५०० तरुण गल्लीत घुसल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला.

दरम्यान, शिवराज्याभिषेक दिनी व्हाॅट्सअॅपवर आक्षेपार्ह स्टेटस लागल्यानंतर तणाव निर्माण झाला आहे. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यानंतर मुस्लीम संघटनांनी सुद्धा पत्रक प्रसिद्धीस देत पोलिसांनी समाजकटंकांना वेळीच ठेचावे, अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे केली आहे. कोल्हापुरात मंगळवारी घडलेल्या प्रकारानंतर 7 जून रोजी बंदची हाक देण्यात आली आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत अशा घटना पुन्हा होऊ नयेत, अशी मागणी केली आहे. मुस्लीम समाजाकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही तरुणांनी लावलेल्या आक्षेपार्ह स्टेटसमुळे कोल्हापूरच्या एकतेला तडा गेल्यासारखे वातावरण झालं आहे. पोलिसांनी अशा समाजकंटकांना वेळीच ठेचावे, त्यांना कडक शासन करावे, तरच अशा प्रवृत्ती पुन्हा निर्माण होणार नाहीत, असे पत्रकात म्हटले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number