दहा मिनिटे पोलीस हटवा – मोहित कंबोज

एमआयएमचे तेलंगणातील आमदार अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबाद दौऱ्यादरम्यान गुरुवारी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. मात्र, औरंगजेबाच्या कबरीचे अकबरुद्दीन ओवैसी यांनी दर्शन घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे. अकबरुद्दीन ओवैसी यांनी खुलाताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. यावेळी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.  दरम्यान, याप्रकरणी अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘दहा मिनिटे पोलीस हटवा, […]

दहा मिनिटे पोलीस हटवा – मोहित कंबोज

एमआयएमचे तेलंगणातील आमदार अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबाद दौऱ्यादरम्यान गुरुवारी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. मात्र, औरंगजेबाच्या कबरीचे अकबरुद्दीन ओवैसी यांनी दर्शन घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

अकबरुद्दीन ओवैसी यांनी खुलाताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. यावेळी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.  दरम्यान, याप्रकरणी अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘दहा मिनिटे पोलीस हटवा, हिंदू ओवैसीला धडा शिकवतील’ असे वक्तव्य, भाजप नेते मोहित कंबोज यांनी केले आहे.

मोहित कंबोज यांनी ट्विट केले की, ‘हे ठाकरे सरकार आहे. औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन भाषण केले जाते तर हिंदूंवर टिप्पणी केली जाते. यावर सरकार काहीही कारवाई करत नाही. मात्र, हनुमान चालीसा वाचल्यानंतर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. तर १००० मशिदींमध्ये लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी देण्यात येते. व्हा… रे ठाकरे सरकार’, असे मोहित कंबोज यांनी ट्विट केले.

https://twitter.com/mohitbharatiya_/status/1525018176865480704

‘औरंगजेबाच्या कबरीवर जाणे राजद्रोह’

तसेच याप्रकरणी, याप्रकरणी भाजप आमदार राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राम कदम म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीवर जाणे म्हणजे राजद्रोह असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे ओवैसींवर राजद्रोह लावण्याची मागमी राम कदम यांनी केली आहे. तसेच ओवैसींवर राजद्रोह लावण्याची तुमची हिम्मत तुमच्यातील साहस महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांना पाहायचे आहे, असेही कदम म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number