मुंबईत हिंदूंचा ‘जनआक्रोश’

मुंबईत हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्च्यात हजारो नागरिकांसह भाजप आणि शिंदे गटाचे नेतेही सहभागी आहेत. रविवार दिनांक २९ जानेवारी, २०२३ रोजी, दादर येथील शिवाजी पार्क येथे हिंदुत्ववादी संघटनांकडून हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. धर्मांतर आणि लव्ह जिहादविरोधात हजारोंचा जनसमुदाय शिवाजी पार्कवर गोळा झाला आहे. लव्हजिहादविरोधी आणि धर्मांतरविरोधी कायदा तयार करण्यात यावा, […]

मुंबईत हिंदूंचा ‘जनआक्रोश’

मुंबईत हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्च्यात हजारो नागरिकांसह भाजप आणि शिंदे गटाचे नेतेही सहभागी आहेत.

रविवार दिनांक २९ जानेवारी, २०२३ रोजी, दादर येथील शिवाजी पार्क येथे हिंदुत्ववादी संघटनांकडून हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. धर्मांतर आणि लव्ह जिहादविरोधात हजारोंचा जनसमुदाय शिवाजी पार्कवर गोळा झाला आहे. लव्हजिहादविरोधी आणि धर्मांतरविरोधी कायदा तयार करण्यात यावा, अशी या आंदोलकांची मागणी आहे.
भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, भाजपा नेते आशिष शेलार, प्रवीण दरेकर, चित्रा वाघ, कृपाशंकर सिंग, किरीट सोमय्या, नितेश राणे यांच्यासह अनेक पदाधिकारीही या मोर्च्यात सहभागी झाले आहेत. तसेच शिंदे गटाचे सदा सरवणकर हेही या मोर्च्यात उपस्थित होते.

परळ येथील कामगार क्रीडा मैदानावर या मोर्च्याची सांगता होणार आहे.

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number