त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात हिंदू महासंघ आक्रमक

राज्यात अनेख ठिकाणी तणावग्रस्त परिस्थिती असताना त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. उरुसादरम्यान इतर धर्मियांकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्र्यंबकेश्वराच्या पिंडीवर इतर धर्मियांकडून चादर चढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले. पोलिसांच्या आणि मंदीर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी ब्राम्हण महासंघाने केली आहे. तर कारवाई […]

त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात हिंदू महासंघ आक्रमक

राज्यात अनेख ठिकाणी तणावग्रस्त परिस्थिती असताना त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. उरुसादरम्यान इतर धर्मियांकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्र्यंबकेश्वराच्या पिंडीवर इतर धर्मियांकडून चादर चढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले. पोलिसांच्या आणि मंदीर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला.

याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी ब्राम्हण महासंघाने केली आहे. तर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ब्राम्हण महासंघाने दिला होता. तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे पोलीस अधिक तपास करत असून ५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, बुधवारी हिंदू महासंघ त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात आक्रमक झाला आहे. हिंदू समाजाकडून त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराचे शुद्धीकरण करण्यात आलं आहे. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर विविध हिंदू संघटना एकत्र आल्या असून समाजाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. त्र्यंबकेश्वर प्रकरणी ७२ तासांमध्ये कारवाई करा अन्यथा राज्यातील मंदिरे दोन दिवस बंद ठेवण्यात येतील, असा इशारा ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

तसेच, प्रवेश द्वारावर असलेल्या एका फलकासमोरील अतिक्रमण देखील पदाधिकाऱ्यांनी काढले. दरवाजासमोर हिंदूंशिवाय मंदिरात कुणालाही प्रवेश नाही असे आशयाचे फलक लावण्यात आले आहे. याच फलका समोरील अतिक्रमण देखील काढण्यात आले. या संपूर्ण आंदोलनादरम्यान हिंदू समाजाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number