मुंबईत पोलिस भरती लेखी परिक्षेत हायटेक कॉपी झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे. ७ मे रोजी मुबंईत पोलिस भरतीचा पेपर झाला. पोलिस भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेमध्ये हायटेक कॉपी झाल्याचे पुरावे मुंबई पोलिसांना मिळाले आहेत. या प्रकरणाचा कसून तपास पोलिसांनी सुरु केला असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
परीक्षा देणाऱ्या उमेदवारांकडे अत्याधुनिक यंत्र होतं. प्रश्न पत्रिकांचे फोटो बटन कॅमेऱ्याद्वारे केंद्राबाहेर आले. परीक्षा केंद्रातून मेलद्वारे हे फोटो बाहेर आल्याचं सांगण्यात येत आहे.त्यानंतर काही मिनिटांतच केंद्राबाहेरील शिक्षकांनी मायक्रो हेडफोनच्या माध्यामातून उत्तरं दिली. काही उमेदवारांच्या कानामध्ये मायक्रो हेडफोन होते. त्याद्वारे त्यांना उत्तरं मिळत गेली.
याप्रकरणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. संघटनेकडे पुढच्या तपासासाठी अधिकचे पुरावे मागितले आहेत.मागच्या काही वर्षांपासून राज्यात भरती प्रक्रियेला खोडा बसलेला आहे. एखाद्या विभागासाठी जागा निघाल्या तर त्यात गोंधळ उडतो. पोलिस भरतीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे. मयक्रो डिव्हाईसच्या माध्यमातून हे पेपर फुटल्याचा प्रकार घडल्याचा संशय आहे. मुंबई पोलिस प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.