कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा धोका निर्माण झाला आहे्. जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद आहेत. त्यामुळे कोल्हापूरमध्ये नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यातील बंधारेही पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरमध्ये नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा धोका निर्माण झाला आहे.
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने धोका पातळीपासून केवळ 2 फूट कमी आहेत.
गगनबावडा,पन्हाळा मार्गे कोकणाशी संपर्क तुटला आहे. तर मांडुकली, केर्ली मार्गावर पुराचे पाणी शिरले आहे.
राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालाही याचा फटका बसत आहे. किणी परिसरात वारणा पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 9 मार्ग पूर्ण बंद करण्यात आले आहेत. तर 80 बंधारे पाण्याखाली असून एसटीची सेवा विस्कळीत झाली आहे.