सत्तांतरानंतरची ईडी आणि आयकर विभागानं पहिली मोठी कारवाई करत हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी केली. अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याप्रकरणी ईडी आणि आयकर विभागाने ही धाड मारली. हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरी ईडी आणि आयकर विभागाने छापेमारी केली आहे. ईडी आणि आयकर विभागाचे २० अधिकारी आज पहाटे ६.३० वाजता हसन मुश्रीफ यांच्या घरी आले. या सर्वांनी सकाळपासूनच मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. तसेच घराभोवती सुरक्षा जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.अजूनही आयकर विभाग आणि ईडीची तपासणी सुरू आहे. घरातील कुणालाही बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच बाहेरच्यांना आत येण्यास मज्जाव करण्यात येत आहे. मुश्रीफ यांच्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. त्यामुळेच मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी हसन मुश्रीफ यांचावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी गंभीर आरोप केले होते. २७०० पानी पुरावे घेऊन सोमय्या ईडीच्या कार्यालयात पोहोचले होते. सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखानामध्ये कोट्यवधी रुपयांची बेनामी शेअर कॅपिटल भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. यासाठी पुरावे घेऊन सोमय्या ईडीच्या ऑफिसमध्ये गेले होते. ईडीमधील ४ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर बैठक झाली. कागदोपत्री पुरावे दिले, अशी माहिती सोमय्यांनी दिली होती.
‘शेतकऱ्यांनी या साखर कारखान्यामध्ये गुंतवणूक केली आहे. पण हसन मुश्रीफ परिवारामधील सहा व्यक्तींचा सहभाग असल्याचा किरीट सोमय्या यांनी दावा केला. अबिद हसन मुश्रीफ ,नाविद हसन मुश्रीफ, साजिद हसन मुश्रीफ, नबिला अबिद मुश्रीफ, सबिना साजिद मुश्रीफ, साहेरा हसन मुश्रीफ, यांची नावे आहेत. या व्यक्तीच्या नावाने १३ कोटी ३० लाख ४९ हजार रुपयांची गुंतवणूक केली. हसन मुश्रीफ यांनी भ्रष्टाचार करून काळा पैसा पांढरा करून मनी लाँड्रिंग करून ७८ कोटी ९१ लाख ५१ हजार ८३० रुपयांचे शेअर घेण्यात आले असा आरोपही सोमय्यांनी केला होता.