‘परमबीर सिंग यांना मुख्य आरोपी करणं केंद्र सरकारला मान्य नसावं’

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेलं वाहन तसंच व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच्या तपास पथकाचे प्रमुख पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांचा राष्ट्रीय तपास यंत्रणेतील कार्यकाळ सोमवारी संपुष्टात आला. दरम्यान इतक्या मोठ्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अनिल शुक्ला यांच्या बदलीचं कारण काय? अशी विचारणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. “मुकेश अंबानींच्या घरासमोर स्फोटकं का […]

‘परमबीर सिंग यांना मुख्य आरोपी करणं केंद्र सरकारला मान्य नसावं’

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेलं वाहन तसंच व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच्या तपास पथकाचे प्रमुख पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांचा राष्ट्रीय तपास यंत्रणेतील कार्यकाळ सोमवारी संपुष्टात आला. दरम्यान इतक्या मोठ्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अनिल शुक्ला यांच्या बदलीचं कारण काय? अशी विचारणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

“मुकेश अंबानींच्या घरासमोर स्फोटकं का ठेवली? कोणी ठेवली? हा तपास करण्याची आवश्यकता होती. दरम्यान परमबीर सिंग यांनी पत्र लिहिलं त्याचवेळी मी ते या कटात सहभागी असल्याचं म्हटलं होतं. ते माफीचे साक्षीदार होऊ इच्छित आहेत. मला या प्रकरणात वेगळा वास येत आहे असं सांगितलं होतं,” असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. “अनिल शुक्ला यांनी परमबीर सिंग यांना मुख्य आरोपी केलं असावं आणि हे केंद्र सरकारला मान्य नसावं,” अशी शंका हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे.

“परमबीर सिंग, वाझे या प्रकरणात सहभागी असावेत. तपास अजून का होत नाही. वाझेंची रवानगी कोठजीत झाली आहे तरीदेखील चौकशी झालेली नाही. इतका मोठा तपास सुरु असतानाही बदली कशासाठी? काहीतरी शिजत असून त्याची चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number