Baramati By Election : बारामती पोटनिवडणूक प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांचे सूचक विधान; "राष्ट्रवादी लढणार नसेल तर…"

महाड येथील चवदार तळे सत्याग्रह दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने रायगडमध्ये बोलत असताना बारामती पोट निवडणुकीत हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.

Baramati By Election :  बारामती पोटनिवडणूक प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांचे सूचक विधान; &quotराष्ट्रवादी लढणार नसेल तर…&quot

महाड येथील चवदार तळे सत्याग्रह दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने रायगडमध्ये बोलत असताना बारामती पोट निवडणुकीत हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. बारामतीची जागा ही मुळात राष्ट्रवादीकडे आहे. मागील दोन्ही निवडणुका तुतारी चिन्हावर लढविली होती त्यामुळे त्यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे अस सपकाळ म्हणालेत. आज महाड येथील चवदार तळे सत्याग्रह दिनी आले असता त्यांनी ही विधान केलं आहे. तसेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांनी आपली भुमिका स्पष्ट करावी, असं कॉंग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. लोकसभा, विधानसभा निवडणूकीत हि जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने लढवली होती. ते जर लढत नसतील तर त्यानंतर आमच्याकडे अनेक पर्याय असतील असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. 

हेही वाचा- Chitra Wagh On Ashok Kharat Case:"हे सरकार अ‍ॅक्शन घेणार, आता सत्य लपणार नाही" कॅप्टन खरात प्रकरणावर चित्रा वाघ कडाडल्या
तसेच राज्यात सध्या कॅप्टन खरात प्रकरणी राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरू लागलीय यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ देखील चांगलेच संतापले आहेत. सरकार अशा व्यक्तींना वाचविण्याचा प्रयत्न करत असून हे सरकार बेशरम आहे, जनाची नाही तरी मनाची सुद्धा लाज सरकारमध्ये उरलेली नाही. अशा शब्दात सरकारवर त्यांनी हल्लाबोल केला. महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर या आरोपींना वाचविण्यासाठी धावत जात असतात. मात्र यावेळी त्यांचा कडेकोट झाला असून तत्काळ महिला आयोगाच्या पदावरून त्यांना बरखास्त करावे अशी मागणी त्यांनी केली. मात्र असं असल तरी वॉशिंग मशीन असणारी भाजप त्यांना सुद्धा वॉशिंगमधून काढून क्लीन चिट देईल, अस म्हणत त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number